Cyclone Dana: 14 ट्रेन्स रद्द, 5 राज्यांत 56 टीम्स हाय अलर्टवर… ‘दाना’ चक्रीवादळ कधी धडकणार ?

किनारपट्टीच्या संदर्भात ICG चे वरिष्ठ अधिकारी इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने काम करत आहेत. मच्छीमार आणि किनारपट्टी भागात राहणाऱ्या लोकांना चक्रीवादळ ओसरल्यानंतरच समुद्रात किंवा किनारी भागात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय तटरक्षक दल आणि आपत्ती निवारण पथके सतर्क आहेत.

Cyclone Dana: 14 ट्रेन्स रद्द,  5 राज्यांत 56 टीम्स हाय अलर्टवर... ‘दाना’ चक्रीवादळ कधी धडकणार ?
‘दाना’ चक्रीवादळ
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 9:56 AM

दाना चक्रीवादळाची सध्या बरीच चर्चा असून या वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारे खबरदारी घेण्यात येत आहे. हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दल या वादळावर सातत्याने लक्ष ठेवून आहे. दाना वादळामुळे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, देशाच्या पूर्व किनारपट्टीला दाना चक्रीवादळाचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय तटरक्षक दल परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ICG कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असून आवश्यक खबरादरी घेण्यात येत आहे. किनारपट्टीच्या संदर्भात ICG चे वरिष्ठ अधिकारी इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने काम करत आहेत. मच्छीमार आणि किनारपट्टी भागात राहणाऱ्या लोकांना चक्रीवादळ ओसरल्यानंतरच समुद्रात किंवा किनारी भागात जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय तटरक्षक दल आणि आपत्ती निवारण पथके सतर्क आहेत.

अनेक ट्रेन्स रद्द

दाना चक्रीवादळामुळे छत्तीसगडमधून जाणाऱ्या 14 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनशी संलग्न जनसंपर्क अधिकाऱ्याने ही माहिती दिली. एलटीटी-पुरी एक्सप्रेस, दुर्ग-पुरी एक्सप्रेस, ब्रह्मपूर-सुरत एक्सप्रेस, पुरी-दुर्ग एक्सप्रेस, पुरी-अजमेर एक्सप्रेस, पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस आणि पुरी-ऋषिकेश एक्सप्रेस यांचा रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये समावेश आहे. विशाखापट्टणम-अमृतसर हिराकुड एक्सप्रेस आणि पुरी-निजामुद्दीन एक्सप्रेस 25 ऑक्टोबर रोजी रद्द राहतील, तर 23 ऑक्टोबर रोजी ऋषिकेश-पुरी उत्कल एक्सप्रेस आणि सुरत-ब्रह्मपूर एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या. वादळामुळे 22 ऑक्टोबर रोजी गांधीधाम-पुरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती. तर अजमेर-पुरी एक्स्प्रेस २९ ऑक्टोबरला आणि अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस 26ऑक्टोबरला रद्द होईल.

हवामान विभागाने काय सांगितलं ?

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे हे भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि धामरा बंदर दरम्यान ओडिशामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. 24 ऑक्टोबरच्या रात्रीपासून चक्रीवादळाच्या आगमनाची प्रक्रिया सुरू होईल आणि 25 ऑक्टोबरला सकाळपर्यंत त्याचा परिणा दिसेल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. हे चक्रीवादळ जेव्हा किनारपट्टीवर धडकेल तेव्हा तेव्हा दोन मीटर उंचीच्या लाटा अपेक्षित असून हे चक्रीवादळ ताशी 120 किलोमीटर वेगाने किनारपट्टीवर धडकू शकते. दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) ओडिशा आणि पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये एकूण 56 पथके तैनात केली आहेत. हे चक्रीवादळ 24 ते 25 ऑक्टोबर दरम्यान ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे.

सर्व पथके तैनात

या पार्श्वभूमीवर सर्व पथके तैनात आहेत. या पथकांकडे खांब आणि झाडे तोडण्याची उपकरणे, बोटी, प्राथमिक उपचार आणि पुरापासून बचावासाठी इतर उपकरणे आहेत, असे एनडीआरएपच्या अधिकाऱ्याने सांगितले. चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एकूण 45 टीम्स मागवल्या होत्या. मात्र 56 पथके तैनात करण्यात आली आहेत असेही नमूद करण्यात आलं.

परिस्थितीनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये पथके तैनात करण्यात आली आहेत. ओडिशात 20 टीम्स असून त्यापैकी एक राखीव आहे, तर पश्चिम बंगालमध्ये 17 पैकी 13 टीम्स राखीव आहेत. एनडीआरएफ व्यतिरिक्त संबंधित राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारीही या भागात तैनात करण्यात आले आहेत असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आंध्र प्रदेश आणि झारखंडमध्ये प्रत्येकी 9 टीम्स, तर छत्तीसगडमध्ये एक टीम तैनात करण्यात आली आहे. गुरुवार आणि शुक्रवार दरम्यान रात्री चक्रीवादळ आल्यानंतर या राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
राष्ट्रवादीकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, काय आहे वैशिष्ट्य?
राष्ट्रवादीकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, काय आहे वैशिष्ट्य?.
शिवसेनेकडून विधानसभेच तिकीट मिळताच गुलाबराव पाटील म्हणाले, मला खात्री
शिवसेनेकडून विधानसभेच तिकीट मिळताच गुलाबराव पाटील म्हणाले, मला खात्री.
'आता गनिमी काव्याने डाव..', जरांगेंचा लवकरच पहिला उमेदवार जाहीर होणार
'आता गनिमी काव्याने डाव..', जरांगेंचा लवकरच पहिला उमेदवार जाहीर होणार.
मलिक वेटिंगवर... NCPच्या पहिल्या यादीत नाव नाही, तिकीट मिळणार की नाही?
मलिक वेटिंगवर... NCPच्या पहिल्या यादीत नाव नाही, तिकीट मिळणार की नाही?.
माहीममध्ये यंदा बिग फाईट, मनसे-शिंदे गट अन् ठाकरे गटामध्ये तिरंगी लढत
माहीममध्ये यंदा बिग फाईट, मनसे-शिंदे गट अन् ठाकरे गटामध्ये तिरंगी लढत.
निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ येथे पक्षप्रवेशाची जय्यत तयारी
निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ येथे पक्षप्रवेशाची जय्यत तयारी.
महायुतीतून भाजपचे 99, शिंदेचे 45 उमेदवार जाहीर, या 18 जागांवर पेच कायम
महायुतीतून भाजपचे 99, शिंदेचे 45 उमेदवार जाहीर, या 18 जागांवर पेच कायम.
'संजय राऊत हा कुत्र्यासारखा...', शहाजी बापू पाटलांची घसरली जीभ
'संजय राऊत हा कुत्र्यासारखा...', शहाजी बापू पाटलांची घसरली जीभ.
दादांच्या राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर, 'या' 38 उमेदवारांना संधी
दादांच्या राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर, 'या' 38 उमेदवारांना संधी.
शिंदे-भाजपात 5 जागांचा वाद, 2019 ला बंडानं खेळखंडोबा, यंदा काय होणार?
शिंदे-भाजपात 5 जागांचा वाद, 2019 ला बंडानं खेळखंडोबा, यंदा काय होणार?.