AI तर गेम चेंजर; न्यायालयात त्याचा वापर करणार का? काय म्हणाले सरन्यायाधीश

AI CJI Chandrachud: कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (AI) देशाचे सरन्यायाधीशांनी मोठे वक्तव्य केले आहे. एआय हे भविष्यात गेम चेंजर ठरु शकते, असे त्यांना वाटते. पण यासोबतच या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी त्यांनी धोके ओळखण्याचा सल्ला पण दिला. भारत आणि सिंगापूर न्यायीक परिषदेदरम्यान त्यांनी एआयविषयी मत मांडले.

AI तर गेम चेंजर; न्यायालयात त्याचा वापर करणार का? काय म्हणाले सरन्यायाधीश
न्यायापालिकेत एआयचा वापर होणार का?
Follow us
| Updated on: Apr 14, 2024 | 3:19 PM

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मोठी क्रांती आणू शकते. हा आधुनिक तंत्रज्ञान गेम चेंजर असल्याचे मत सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी मांडले. एआयचा भारतीय न्याय व्यवस्थेत वापर केल्या जाऊ शकतो, असे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षांत एआयविषयी जवळपास प्रत्येक क्षेत्रात चर्चा सुरु आहे. एआय किती फायदेशीर आणि किती नुकसानकारक आहे, याची चर्चा सुरु आहे. याबाबत देशाचे सरन्यायाधीशांनी पण त्यांचे मत मांडले आहे. काय म्हणाले चंद्रचूड…

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भारत आणि सिंगापूर न्यायीक परिषदेत तंत्रज्ञानाच्या वापरावर त्यांचे मत मांडले. त्यांनी एआयच्या आवश्यकतेवर पण भर दिला. न्यायीक प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि एआयचा वापर हा गेम चेंजर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्याचा काळ हा बदल स्वीकारण्याचा आहे, आपल्याला तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर कसा करता येईल हे बघावे लागेल, असे ते म्हणाले. त्यांनी एआयच्या वापरासंबंधी इशारा पण दिला आहे. या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर होता कामा नये, असा इशारा पण त्यांनी दिला.

एआयचा चुकीचा वापर

हे सुद्धा वाचा
  1. सरन्यायाधीशांनी एआयच्या चुकीच्या वापरावर चिंता व्यक्त केली. या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर व्हायला नको, असे त्यांनी स्पष्ट केले. एआयमुळे श्रीमंत आणि गरिबांतील दरी अधिक रुंदावणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.
  2. अनेक उच्च न्यायालयात AI चा वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले. एआयच्या मदतीने लाईव्ह ट्रान्स्क्रिप्शन सेवा देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही सेवा सध्या हिंदी भाषेसह अन्य 18 प्रादेशिक भाषामध्ये पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
  3. अनेक कामात एआयचा मोठा उपयोग होऊ शकतो, असे ते म्हणाले. यामध्ये डॉक्युमेंट रिव्ह्यू, केस मॅनेजमेंट, शेड्युलिंग यांचा समावेश आहे. एआयच्या मदतीने प्रशासनाचे काम सुलभ होणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे पेपरवर्क कमी होईल. पैशांसह वेळेची बचत होईल. तर याचिकाकर्त्यांना जलद न्यायदानासाठी पण एआय मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.