सरसंघचालक भागवतांच्या डीएनएवर ओवेसींनी काय केला पलटवार…

| Updated on: Oct 05, 2022 | 4:35 PM

मोहन भागवत यांच्यासाठी आजचा दिवस हा द्वेषपूर्ण भाषणासाठी त्यांचा एक महत्वाचा दिवस असल्याची टीका ओवेसींनी केली आहे.

सरसंघचालक भागवतांच्या डीएनएवर ओवेसींनी काय केला पलटवार...
Follow us on

नवी दिल्लीः विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Balasaheb Patil) यांनी लोकसंख्येबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करून त्याची समान अंमलबजावणी करावी आणि कोणालाही सूट दिली जाऊ नये असं मत त्यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या विधानावर बुधवारी एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जोरदार हल्लाबोल केला.देशात लोकसंख्या नियंत्रणाची गरज नसल्याचे सांगत त्यांनी मुस्लिमांच्या प्रजनन दरात आता जलद घट झाल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसंख्या धोरणावर मोहन भागवत यांनी बोलल्यावर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करत त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

मोहन भागवत यांच्यासाठी आजचा दिवस हा द्वेषपूर्ण भाषणातील त्यांचा एक महत्वाचा दिवस आहे. लोकसंख्येच्या असंतुलनामुळे आणि त्याच्या भीतीमुळे जगभरात नरसंहार, वांशिक शुद्धीकरण आणि द्वेषासारख्या घटना घडत आहेत.

खासदार ओवेसी यांनी मोहन भागवत यांच्यावर टीका करताना त्यांनी ट्विट करत म्हणाले की, जर हिंदू आणि मुस्लिमांचा “डीएनए” समान असेल तर असंतुलन आहे कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही कारण आता मुस्लिम समाजाची लोकसंख्या आता आधीच घटली असल्याचेही त्यांनी सांगितले.

विजयादशमीनिमित्त बुधवारी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमप्रसंगी बोलताना मोहन भागवत यांनी सांगितले की, लोकसंख्या नियंत्रणाबरोबरच धार्मिक आधारावर लोकसंख्या वाढीतील असंतुलनाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. त्याकडे दुर्लक्षित केले जाऊ नये असंही त्यांनी वक्तव्य केले होते.

लोकसंख्या धोरणाबद्दल बोलताना मोहन भागवत म्हणाले की, देशातील लोकसंख्येबाबत सर्वसमावेशक धोरण तयार केले पाहिजे. जे धोरण सर्वांना समानतेने लागू होईल आणि त्यातून कोणालाही सूट मिळू नये असंही मत त्यांनी व्यक्त केले. लोकसंख्येच्या असंतुलनामुळे भौगोलिक सीमारेषेतसुद्धा बदल होत असल्याचेही त्यांनी सांगितले.