पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले… आधी कबूतर आता चित्ते सोडतो… ओवैसी म्हणाले… आणि रेपिस्टही

आपल्या देशात आधी कबूतर सोडले जायचे आता चित्ते साडले जातात, असं वक्तव्य पंतप्रधानांनी केलं. मात्र त्यावर असदुद्दीन ओवैसी यांनी धारदार टीका केली. पंतप्रधानांच्या वक्तव्यावरील त्यांच्या रिट्वीटवरून संताप व्यक्त होतोय..

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले...  आधी कबूतर आता चित्ते सोडतो... ओवैसी म्हणाले... आणि रेपिस्टही
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 1:58 PM

नवी दिल्लीः  आम्ही आधी कबूतर सोडत असायचो, आता चित्ते सोडतो, अशा आशयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं वक्तव्य सध्या बातम्यांमधून गाजतंय. अनेक वर्षांनंतर प्रथमच देशात चित्ते असल्याचं सामर्थ्य त्यांना वर्णन करायचं होतं. कार्यक्रम होता, गुजरातमधील (Gujrat) डिफेन्स एक्सपोच्या उद्घाटनाचा. पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत देश आधी कबूतर सोडत होता, आता चित्ते सोडण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. यावरच पलटवार करत AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी लिहिलंय… आणि रेपिस्टही…

असदुद्दीन ओवैसी यांनी बिल्किस बानो केसवरून ही टीका केल्याचं म्हटलं जातंय. गुजरात सरकारने काही दिवसांपूर्वी या केसप्रकरणी ११ दोषींना मुक्त केलं होतं. यावरून भाजपावर प्रचंड टीका होतेय. सुप्रीम कोर्टातही या निकालावर आव्हान देण्यात आलंय.

असदुद्दीन ओवैसी यांनी यापूर्वीदेखील बिल्किस बानो आणि अंकिता मर्डर केस प्रकरणी भाजपवर टीका केलीआहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात अंबाजी येथील सभेत त्यांनी नारी शक्तीवर भाषण केलं होतं. त्यावरही ओवैसींनी ट्विट केलं होतं.

पंतप्रधान महोदय, कृपया बिलकिस बानो आणि अंकिताच्या कुटुंबियांची भेट घ्या, त्यांना तुमच्याशी काही बोलायचं असू शकतं… अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं होतं.

बिल्किस बानो गँगरेप प्रकरणातील दोषींच्या मुक्ततेविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली होती. गुजरात सरकारच्या माफी धोरणानुसार या प्रकरणातील दोषींची सुटका करण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. मात्र गुजरात सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयानेच याला मंजुरी दिली होती, असं कोर्टात सांगण्यात आलंय. दरम्यान, सुप्रीम कोर्टात दोषींविरोधात केलेल्या याचिकेवरच गुजरात सरकारने अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय. या प्रकरणी २९ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.