ओवैसी आता ममतादीदींना भिडणार, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी MIM चा शड्डू

एमआयएम बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमध्येही कामगिरी करणार, असा निर्धार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला

ओवैसी आता ममतादीदींना भिडणार, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी MIM चा शड्डू
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 1:08 PM

नवी दिल्ली : बिहारमध्ये खातं उघडल्यानंतर ‘एमआयएम’चा (MIM) आत्मविश्वास दुणावल्याचे दिसत आहे. आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या (West Bengal Election 2021) रिंगणात एमआयएम उतरणार असल्याची माहिती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दिली. (AIMIM to contest West Bengal Election 2021 declares Aurangabad MP Imtiaz Jaleel)

बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Elections 2020) एमआयएमने 5 जागा जिंकल्या. या यशामुळे पक्षातील कार्यकर्ते आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचा उत्साह वाढल्याचे दिसत आहे. एमआयएम आगामी काळात पश्चिम बंगालच्या निवडणुकाही लढणार असल्याचे संकेत असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी बिहारच्या निकालानंतर दिले होते.

पश्चिम बंगालमध्ये आघाडी करण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. मात्र एमआयएम बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमध्येही कामगिरी करणार, असा निर्धार जलील यांनी व्यक्त केला आहे.

“आम्ही पश्चिम बंगालमधील पक्ष कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहोत. आमच्या कित्येक कार्यकर्त्यांना तृणमूल काँग्रेसने तुरुंगात डांबले आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे की नाही ते ठरणार आहोत. उत्तर प्रदेशात आम्ही याआधीही निवडणूक लढवलेली आहे. यानंतरही लढू” अशी माहिती ओवैसींनी याआधी दिली होती.

बिहारमध्ये पाच जागा खिशात

“पाच वर्षांपूर्वी एमआयएम बिहारमध्ये एकूण 6 जागांवर निवडणूक लढला होता. त्यावेळी आम्ही सर्व जागांवर हरलो होतो. आमच्या पाच उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. त्यानंतर आम्ही मेहनत घेतली. बिहारच्या जनतेशी आम्ही संवाद आणि चर्चा करत राहिलो. त्यानंतर आमच्या मेहनतीला फळ मिळाले. यावर्षी आम्ही 5 जागांवर विजयी झालो. तसेच यापुढेही आणखी मेहनत घेणार असून जनतेसमोर आमची भूमिका मांडणार ” असे ओवैसी निकालानंतर म्हणाले होते.

प. बंगालमध्ये राजकीय स्थिती काय?

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसने (Trinmool Congress) 211 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 44 , डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता. (AIMIM to contest West Bengal Election 2021 declares Aurangabad MP Imtiaz Jaleel)

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डावे पक्ष एकत्र लढणार

पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेस आणि डावे पक्ष एकत्र विधानसभा निवडणूक लढणार आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप आणि इतर बोलणी पूर्ण झाली आहेत. आता सोनिया गांधी या निर्णयावर शिक्कामोर्तब करतील. नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी महागठबंधनमधून एकत्र निवडणूक लढवली होती. यामध्ये काँग्रेसच्या हाताला फार काही लागले नव्हते. मात्र, डाव्या पक्षांनी 12 जागांवर विजय मिळवला होता.

संबंधित बातम्या :

ममता बॅनर्जींच्या पराभवासाठी भाजपचा खास प्लॅन; ‘हे’ पाच नेते गेमचेंजर ठरणार?

बिहारनंतर एमआयएम पश्चिम बंगालमध्ये निवडणुका लढणार? असदुद्दीन ओवैसी यांचे संकेत

(AIMIM to contest West Bengal Election 2021 declares Aurangabad MP Imtiaz Jaleel)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.