विमानतळावरच झाला पायलटचा हार्टअटॅकने मृत्यू, तीन महिन्यातील तिसरी घटना

शेकडो प्रवाशांची सुरक्षा ज्यांच्या अवलंबून आहे अशा विमान चालविण्यासारखे जोखमीचे काम करणाऱ्या पायलटना ताण-तणावाचा सामना करावा लागत आहे. तीन महिन्यात तीन पायलटचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ताज्या घटनेतील पायलटचे वय अवघे 37 होते अशी माहीती उघडकीस आली आहे.

विमानतळावरच झाला पायलटचा हार्टअटॅकने मृत्यू, तीन महिन्यातील तिसरी घटना
Air India pilot heart attackImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 5:00 PM

नवी दिल्ली | 18 नोव्हेंबर 2023 : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर हार्टअटॅक आल्याने एअर इंडियाच्या ( Air India ) एका पायलटचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आह. 37 वर्षीय हिमानिल कुमार ( Himanil Kumar ) विमानतळाच्या टर्मिनल 3 ( Terminal ) वर एअर इंडीयाच्या संचालन विभागात एका प्रशिक्षण सत्रात सहभाग घेतला असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मदत करीत त्यांना विमानतळावरील एका डॉक्टरांकडे नेले. परंतु त्यांना वाचविण्यात यश आले नाही.

3 ऑक्टोबरपासून सुरु होते प्रशिक्षण

सिनियर कमांडर हिमानिल कुमार हे प्रशिक्षण सत्रात सहभागी झाले होते. या प्रशिक्षणात सिंगल सिट विमान उडविणाऱ्या मोठ्या विमानाचे प्रशिक्षण दिले जात होते. एअर इंडियाचे अधिकाऱ्याने सांगितले की ए 320 विमानानंतर बोईंग 777 विमानाचे 3 ऑक्टोबरपासून प्रशिक्षण सुरु करण्यात आले होते. हिमानिल कुमार यांनी 23 ऑगस्ट रोजी आपली मेडीकल परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यात त्यांना फिट मानले गेले होते. त्यांच्या कामात त्यांनी थकवा किंवा कोणाताही त्रास असल्याची तक्रार देखील केली नव्हती.

एअर इंडीया कुटुंबियांच्या पाठीशी

एअर इंडीयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही आमचे सहकारी पायलट हिमानिल कुमार यांच्या निधनाने दु:खी आहोत. कॅप्टन कुमार एक वरिष्ठ कमांडर होते. ते एका नियमितपणे टी – 3 दिल्ली विमानतळावरील आमच्या कार्यालयात आले होते. त्यांनी कार्यालयात अचानक अस्वस्थ वाटू लागल्याची तक्रार केली. सहकाऱ्यांनी त्यांना लागलीच मदत केली. त्यांना विमानतळावर दवाखान्यात नेले. डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही ते वाचू शकले नाहीत. एअर इंडियाची टीम कॅप्टन कुमार यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

तीन महिन्यात तिसरा मृत्यू

तीन महिन्यातील अशाप्रकारची ही तिसरी घटना आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात पुण्यासाठी उड्डाणाची तयारी करताना इंडिगोच्या एका पायलटचा नागपूर विमानतळाच्या बोर्डींग गेटवर अचानक कोसळून त्याचा हार्टअटॅक मृत्यू झाला. प्राथमिक उपचार दिल्यानंतर तसेच दवाखान्यात नेऊनही हा पायलट वाचू शकला नाही. एक दिवसआधी स्पाईसजेटचे एक माजी कॅप्टन जे आधी कतार एअरवेजमध्ये कामाला होते. त्यांचे दिल्ली ते दोहा प्रवासी म्हणून प्रवास करताना हृदयविकाराने निधन झाले होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.