BIG BREAKING | दिल्लीत अजित पवार, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यात बंद दाराआड चर्चा

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घडामोडी काही कमी होताना दिसत नाहीत. दिल्लीत आज अजित पवार, पंतप्रधान नरेद्र मोदी, अमित शाह आणि जे. पी, नड्डा यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे.

BIG BREAKING | दिल्लीत अजित पवार, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यात बंद दाराआड चर्चा
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 11:37 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घडामोडी काही कमी होताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एनडीएच्या बैठकीनिमित्ताने आज दिल्लीला गेले होते. पण या बैठकीनंतर एक वेगळा घटनाक्रम बघायला मिळाला. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडले. पण त्यांच्यासोबत अजित पवार बाहेर पडले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानतळाच्या दिशेला निघाले तेव्हा अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे. 981846या नेत्यांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपकडून आज नवी दिल्लीत NDAची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली. या बैठकीच्या अंतिम टप्प्यात नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.

ही बैठक पार पडल्यानंतर मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अशोका हॉटेलमधून बाहेर पडले. त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे खासदार राहुल शेवाळे हे अशोका हॉटेलच्या बाहेर पडले. त्यानंतर जवळपास अर्धातासांनी अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्यासोबत अशोका हॉटेलच्या बाहेर पडले. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

बैठकीत अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल

अजित पवार यांची नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्यासोबत जी बैठक पार पडली त्यावेळी आणखी एक महत्त्वाची व्यक्ती तिथे हजर होती. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते. अजित पवार यांनी गेल्या आठवड्यातच दिल्लीत येवून अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळीदेखील प्रफुल्ल पटेल त्यांच्यासोबत होते. शपथविधीनंतर प्रोटोकॉल म्हणून अजित पवार हे शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला आल्याची प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी त्यावेळी दिली होती.

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना NDAच्या बैठकीत महत्त्वाचं स्थान

एनडीएच्या बैठकीत एक महत्त्वाची गोष्ट बघायला मिळाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या रांगेत बसले होते त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. एकनाथ शिंदे हे अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्या मधोमध बसले होते. तर अजित पवार हे अमित शाह यांच्या बाजूला बसले होते. पण ही बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री अशोका हॉटेलच्या बाहेर आले. त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि ते विमानतळाच्या दिशेला रवाना झाले. तर या दरम्यान हॉटेलमध्ये अजित पवार आणि मोदी-शाह यांच्यात 20 ते 25 मिनिटे  बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.