Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नावाचा शॉर्टफॉर्म… मास्क आणि टोपी घालायचे, सत्ता नाट्यावेळी अजितदादा वेष बदलून जायचे दिल्लीत; अमित शाहांसोबत झाल्या एवढ्या बैठका

Ajit Pawar : दोन वर्षांपूर्वी अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले. पण त्यापूर्वी त्यांनी काय घडामोडी घडल्या. ते कसे दिल्लीला वेष बदलून आणि नाव बदलून जात होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कशी भेट घेत होते, याचा खास किस्सा सांगितला आहे.

नावाचा शॉर्टफॉर्म... मास्क आणि टोपी घालायचे, सत्ता नाट्यावेळी अजितदादा वेष बदलून जायचे दिल्लीत; अमित शाहांसोबत झाल्या एवढ्या बैठका
अमित शाह यांच्या भेटीचे उलगडले गुपित
Follow us
| Updated on: Jul 28, 2024 | 11:48 AM

अजित पवार हे राष्ट्रवादीतील सहकाऱ्यांसह महायुतीत दाखल झाले. त्यापूर्वी राष्ट्रवादीत भाजपसोबत जाण्यावरुन तीव्र मतभेद झाले होते. त्या नाट्यमय घडामोडी उभ्या देशाने पाहिल्या. त्यानंतर अजित पवार सहकाऱ्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी हा निर्णय अचानक अथवा घाई-घाईत घेतला नाही. तर सरकारमध्ये सहकारी होण्यापूर्वी अजितदादा आणि अमित शाह यांच्यात 10 बैठका झाल्याचा खुलासा स्वतः त्यांनी केला. त्यांनी या भेटीसाठी काय पेहराव केला, नाव कसे बदललेल याचा खास किस्सा सांगितला.

निती आयोगाच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी दिल्लीत होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांनी गेल्या वर्षीतील सत्ता नाट्यवेळीची गुपित उलगडली. खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी त्यांनी त्यावेळेचे किस्से सांगितले.

एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

हे सुद्धा वाचा

यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील सहकाऱ्यांसह सुरत आणि नंतर गुवाहाटी गाठली. नंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. त्यावेळी त्यांनी पण मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांना कसं गुपचूप भेटायचो याचा उलगडा केला होता. तर आता अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होण्यापूर्वीचा किस्सा सांगून सर्वांना आवाक केले.

सत्तानाट्यावेळी 10 बैठका

सत्तानाट्यावेळी अजित पवार आणि अमित शाह यांच्यात 10 बैठकी झाल्या. दिल्लीत त्यांच्या या बैठका झाल्या. त्यासाठी सामान्य विमानाने ते प्रवास करत होते. मास्क आणि टोपी घालून त्यांचा दिल्ली-मुंबई, मुंबई-दिल्ली असा प्रवास करत. त्यांच्या या पेहरावामुळे सह प्रवासी सुद्धा आपल्याला ओळखत नसल्याचा किस्सा त्यांनी सांगितला.

अजित अनंतराव पवार या नावाऐवजी ते A. A. Pawar अशा नावाने प्रवास करायचे. याच नावाने बोर्डिंग पास तयार व्हायचा. महायुतीत सहभागी होण्यापूर्वी जवळपास 10 बैठका त्यांनी अमित शाह यांच्यासोबत केल्या. अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना हा खुलासा केला.

जुलै महिन्यात सत्तांतर

2 जुलै 2022 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केले. शिंदे-फडणवीस सरकारला त्यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर मंत्रिमंडळात सहभागी झाले. अजित दादा यांना अर्थमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली. आता विधानसभेसाठी अधिक जागा मिळाव्यात यासाठी अजित दादांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे.

'बॉम्ब घरात टाकून..', खोक्याला मारहाणीनंतर धमकी, वकिलांनी काय सांगितले
'बॉम्ब घरात टाकून..', खोक्याला मारहाणीनंतर धमकी, वकिलांनी काय सांगितले.
मुंबईकरांनो…लोकलनं प्रवास करताय? बघा उद्या कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक?
मुंबईकरांनो…लोकलनं प्रवास करताय? बघा उद्या कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक?.
'मग तुझ्या राज ठाकरेला सांगतो', मनसे नेता अन् सदावर्तेंमध्ये बाचाबाची
'मग तुझ्या राज ठाकरेला सांगतो', मनसे नेता अन् सदावर्तेंमध्ये बाचाबाची.
राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत मनसेच्या भूमिकेवर स्पष्टच म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत मनसेच्या भूमिकेवर स्पष्टच म्हणाले....
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.