Heat wave : उष्णतेच्या लाटेचा ओडिशाला फटका, उष्णतेच्या लाटेमुळे ओडिशातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा 5 दिवस बंद
राज्यातील उष्णतेची लाट लक्षात घेता ओडिशातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा 26 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत 5 दिवस बंद राहतील.
भुवनेश्वर : देशातील सर्वच भागात उष्णता ही मार्च महिन्यापासूनच वाढत होती त्यानंतर हवामान विभागाने देशातील उष्णता ही वाढत जाईल असा इशारा दिला होता. तर देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट (Heat wave) येऊ शकते असे म्हटले होते. त्यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्राचा देखिल समावेश होता. मार्च महिना गेला असून एप्रिलचा शेवटचा आठवडा सुरू आहे. देशाच्या आणि राज्याच्या अनेक राज्यात सध्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काही प्रमाणात उष्णतेची झळ कमी झाली आहे. मात्र ओडिशाला (Odisha) उष्णतेची झळ बसली असून तेथे राज्य सरकारने निर्णायक पाऊल उचलले आहेत. राज्यात वाढलेल्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा (government and private schools) पुढील पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ओडिसा सरकारने घेतला आहे.
पाच दिवस बंद
राज्यातील उष्णतेच्या लाट पाहता, सर्व सरकारी आणि खाजगी शाळा पुढील पाच दिवस बंद ठेवण्याचे सरकारने घोषणा केल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली. तसेच राज्यभरात सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेची स्थिती पाहता राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत शैक्षणिक संस्था बंद ठेवल्या असल्याचेही विभागाने सांगितले आहे.
विद्यार्थ्यांचे आरोग्य
त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन शिक्षण विभागाने ओडिशातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र वाढत्या तापमानामुळे ऑफलाइन क्लासेसच्या निर्णयावर पालक नाराज होते. तर ओडिशाच्या शाळांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्या लवकर सुरू व्हाव्यात अशी आशाही काही पालकांनी व्यक्त केली होती. आता शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
10वी 12वी बोर्ड परीक्षा होणार
ओडिशातील शाळा बंदची जरी घोषणा करण्यात आली असली तरिही त्याचा परिणाम 10वी 12वी बोर्ड परीक्षांवर होणार नसल्याचेही विभागाने सांगितले आहे. तसेच त्या परिक्षा या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचेही कळवले आहे.
All government and private schools in Odisha to remain closed for 5 days from April 26th to April 30th in view of the heat wave situation in the state: Govt of Odisha pic.twitter.com/YybHws3VJA
— ANI (@ANI) April 25, 2022