नवी दिल्ली : कोविडची तिसरी लाट विरळ होत असताना चौथ्या लाटेच्या चर्चेनं जोर धरला आहे. कोविड संसर्गाला कारणीभूत ठरणाऱ्या ‘डेल्टाक्रॉन’ (DELTACRON) व्हेरियंटन पुन्हा डोक वर काढलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) नव्या व्हेरियंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासहित सात राज्यांत डेल्टाक्रॉनच्या संसर्गानं बाधित रुग्णांच्या शक्यतेनं आरोग्य विभागाच्या गोटात धडकी भरवली आहे. मात्र, सर्व रुग्णांना निगराणीखाली ठेवण्यात आले असून अद्यापपर्यंत अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. ओमिक्रॉन व डेल्टा व्हेरियंटच्या (DELTA VARIENT) संयोगाने ‘डेल्टाक्रॉन’ची उत्पत्ती झाल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल, दिल्ली, गुजरात या सात राज्यांचा ‘डेल्टाक्रॉन’ प्रभावित राज्यांमध्ये अंतर्भाव होतो. डेल्टाक्रॉन विषाणू बाधित पहिला रुग्ण फेब्रुवारी 2022 मध्ये पॅरिसमध्ये आढळला होता. ‘डेल्टाक्रॉन’ विषाणूची लक्षणे पूर्वीच्या विषाणूपेक्षा भिन्न आढळून आली होती.
राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेन डेल्टाक्रॉनच्या लक्षणाबाबत माहिती दिली आहे. गेल्या तीन लाटांमध्ये आढळलेल्या कोविड लक्षणांसापेक्षच साधर्म्य डेल्टाक्रॉनच्या बाबतीत दिसून आलं आहे. डेल्टाक्रॉन संसर्गित रुग्णाला सौम्य तसेच गंभीर स्वरुपातील लक्षणे देखील जाणवू शकतात. तीव्र डोकेदुखी, घाम येणे, अशक्तपणा, दम लागणे, घशात खवखव, हद्याचे ठोके वाढणे आदी लक्षणे जाणवू शकतात. डेल्टाक्रॉनवरील नवीन अभ्यासानुसार, चक्कर येणे तसेच थकवा ही लक्षणे दिसून येत असल्याचं म्हटलं आहे. डेल्टाक्रॉनमुळे पोटाच्या प्रकृतीवर देखील परिणाम जाणवतो आहे. पोटदुख, पोटात जळजळ आदी लक्षणे डेल्टाक्रॉन बाधित रुग्णांत दिसून येत असल्याचं अभ्यासात म्हटलं आहे.
जगभरात डेल्टाक्रॉन बाधितांची संख्या अद्याप नगण्यच आहे. त्यामुळे डेल्टाक्रॉनची दाहकता अद्याप स्पष्ट झाली नाही. आगामी काळात डेल्टाक्रॉन बाधितांच्या नमुन्यांवरुन अंदाज लावता येईल असे मत अभ्यासकांनी वर्तविले आहे.
आयआयटी कानपूरच्या (IIT Kanpur) संशोधकांनी केलेल्या अभ्यासात भारतात कोरोना विषाणू संसर्गाची चौथी लाट जूनपासून येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या सर्वाधिक असेल. ही लाट जवळपास चार महिने राहू शकते, असा अंदाज अभ्यासात वर्तवण्यात आला आहे. आयआटी कानपूरमधील संशोधकांनी सांख्यिकीय मॉडेलवर हा अंदाज जारी करण्यात आला आहे. आयआयटी कानापूरमधील गणित आणि सांख्यिकी विभागाचे साबरा प्रसाद राजेशभाई, सुभ्र शंकर धर आणि शलभ यांच्या नेतृत्त्वात करण्यात आलेल्या अभ्यासात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शरीरात काही लक्षणं दिसून आल्यास व्हा सावध, तुम्हाला टाईप-2 मधुमेहाचा त्रास होऊ शकतो