‘कर्तव्यपथ’च्या उद्घाटनच्या निमंत्रणावरून ममता बॅनर्जी भडकल्या, म्हणाल्या, मी काय…

भाजपकडून सगळा पैशाचा खेळ चालू आणि विरोधातील राजकीय नेत्यांना ईडी आणि सीबीआयची भीती घालून त्यांच्या राजकीय कारकीर्द धोक्यात आणणे हीच नीती भाजपकडून सुरु आहे.

'कर्तव्यपथ'च्या उद्घाटनच्या निमंत्रणावरून ममता बॅनर्जी भडकल्या, म्हणाल्या, मी काय...
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 5:36 PM

कोलकाताः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज सायंकाळी कर्तव्यपथाचे उद्घाटन करुन इंडिया गेटवर असलेल्या स्वातंत्र्यचळवळीतील नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांना आमंत्रण देण्यात आले आहे, मात्र या कार्यक्रमामध्ये त्या सहभागी होतील शक्यताही कमी आहे. कोलकात्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी या कार्यक्रमाविषयी नाराजी व्यक्त करत मी बांधकाम, वेठबिगार मजूर आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केल आहे.

ममता बॅनर्जी कर्तव्यपथ आणि सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाबद्दल बोलताना त्यांनी सडकून टीका केली. त्या म्हणाल्या की, या कार्यक्रमाविषयी बोलताना मला आता वाईट वाटत आहे मात्र मला या कार्यक्रमाबद्दल सचिवांचे पत्र मिळाले.

त्या पुतळ्याचे काय करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या पुतळ्याचे उद्घाटन करणार आहेत, मात्र तिथे असलेल्या आधीच्या मूर्तीचे काय करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

निमंत्रण पत्रावरुन प्रतिसवाल

मला मिळालेल्या पत्रात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करण्यापूर्वी तुम्ही कार्यक्रमस्थळी उपस्थित राहा, पण मी तेथील बांधकाम मजूर आहे का असा प्रतिसवाल त्यांनी सचिवांच्या पत्राला केला आहे.

भाजपचा अहंकार

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जींनी भाजपवर टीका करताना म्हणाल्या की भाजपचा अहंकार आणि त्यांच्या मनात असलेला विद्धेषच त्यांचा पराभव करणार आहे.

घोडेबाजार थांबवला

झारखंडमधील हेमंत सोरेन यांच्या सरकारबद्दल बोलताना त्यांनी दावा केला आहे की काही दिवसांपूर्वी बंगाल पोलिसांनी झारखंडमधील आमदारांना रोख रकमेसह अटक करुन झारखंडमध्ये होणाऱ्या घोडेबाजार रोखला होता आणि सोरेन सरकार पायउतार होत असताना त्यांना वाचवले होते.

काँग्रेस आमदारांकडे लाखो रुपये

पश्चिम बंगालमध्ये पंचला येथे झारखंडमधील तीन काँग्रेस आमदारांच्या कारमधून सुमारे 49 लाख रुपये जप्त करण्यात आले होते. त्याप्रकरणी तीन आमदारांनाही अटक करण्यात आली होती.

ईडी आणि सीबीआयची भीती

याप्रकरणी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या भाजपकडून सगळा पैशाचा खेळ चालू आणि विरोधातील राजकीय नेत्यांना ईडी आणि सीबीआयची भीती घालून त्यांच्या राजकीय कारकीर्द धोक्यात आणणे हीच नीती भाजपकडून सुरु आहे.

आम्ही मजबूत होऊ

त्यामुळे भाजप अशा प्रकारे जेवढा त्रास देईल तेवढे आम्ही मजबूज होऊ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आम्ही आमचा विजय खेचून आणू असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.