‘अमित शाह यांचं आवाहन स्वीकारा’, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची आंदोलक शेतकऱ्यांना विनंती
अमित शाह यांच्या आवाहनाला लवकरात लवकर प्रतिसाद देत चर्चेचा मार्ग खुला करावा. तो शेतकरी आणि राष्ट्रहिताचा असल्याचं अमरिंदर सिंग म्हणाले. शेतकरी प्रश्नावर केंद्र सरकारनं चर्चेसाठी तयार होणं ही स्वागतार्ह बाब आहे. कृषी कायद्याविरोधातील प्राप्त परिस्थितीमध्ये चर्चा हाच एकमात्र उपाय असल्याचंही अमरिंदर सिंग म्हणाले.
चंदिगड: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं आहे. अमित शाह यांचं हे आवाहन स्वीकारण्याचं आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केलं आहे. अमित शाह यांनी सांगितल्याप्रमाणे एका ठराविक स्थानी जाण्यात यावं, जेणेकरुन आपल्या समस्या आणि मागण्याबाबत चर्चा करण्याचा मार्ग प्रशस्त होईल, असं आवाहन अमरिंदर सिंग शेतकऱ्यांना केलंय.(Accept Amit Shah’s appeal, Amarinder Singh’s request to agitating farmers)
“पंजाब सीमेपासून दिल्ली-हरियाणा सीमेवर विविध शेतकरी संघटनेच्या आवाहनानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आंदोलक शेतकऱ्यांना 3 डिसेंबरला चर्चेसाठी बोलावलं आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या सर्व समस्या आणि मागण्यांवर चर्चा करण्यासाठी तयार आहे”, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे.
#WATCH | I appeal to the protesting farmers that govt of India is ready to hold talks. Agriculture Minister has invited them on December 3 for discussion. Govt is ready to deliberate on every problem & demand of the farmers: Union Home Minister Amit Shah pic.twitter.com/pby5YjpMcI
— ANI (@ANI) November 28, 2020
अमित शाह यांच्या आवाहनाला लवकरात लवकर प्रतिसाद देत चर्चेचा मार्ग खुला करावा. तो शेतकरी आणि राष्ट्रहिताचा असल्याचं अमरिंदर सिंग म्हणाले. शेतकरी प्रश्नावर केंद्र सरकारनं चर्चेसाठी तयार होणं ही स्वागतार्ह बाब आहे. कृषी कायद्याविरोधातील प्राप्त परिस्थितीमध्ये चर्चा हाच एकमात्र उपाय असल्याचंही अमरिंदर सिंग म्हणाले.
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या प्रत्येक समस्येबाबत चर्चा करण्यासाठी तयार आहे. मात्र, दिल्लीच्या विविध सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी बुराडी इथल्या निरंकारी मैदानावर एकत्रित यावं, असं आवाहन अमित शाह यांनी केलं आहे.
शेतकरी आंदोलनाचा चौथा दिवस
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या 3 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी आंदोलक शेतकरी गाजियाबाद-दिल्ली सीमेवर पोहोचले आहेत. किमान आधारभूत किमतीत (MSP)आम्हाला गॅरंटी हवी आहे. आम्ही दुसऱ्या शेतकरी संघटनेसोबत चर्चा करणार आहोत आणि त्यानुसार पुढील पाऊल उचलण्यात येईल, अशी माहिती भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते चौधरी राकेश टिकैत यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या:
मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमधील शेतकरी आंदोलनं सुरुच, 41 रेल्वेगाड्या रद्द
Accept Amit Shah’s appeal, Amarinder Singh’s request to agitating farmers