फ्युचर-रिलायन्स रिटेल व्यवहार : अमेझॉनची सर्वोच्च न्यायालयात धाव

फ्युचर-रिलायन्स रिटेल व्यवहार : अमेझॉनची सर्वोच्च न्यायालयात धाव (amazon gone to supreme court against future company)

फ्युचर-रिलायन्स रिटेल व्यवहार : अमेझॉनची सर्वोच्च न्यायालयात धाव
अॅमेझॉनची सर्वोच्च न्यायालयात धाव
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 7:02 PM

नवी दिल्ली : ऑनलाईन शॉपिंगमध्ये अग्रेसर असलेली ई कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या अमेझॉनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या कंपनीने फ्युचर-रिलायन्स रिटेल यांच्यातील व्यवहाराला आव्हान दिले आहे. फ्युचर ग्रुपने गेल्या वर्षी रिटेल व्यवसाय रिलायन्स इंडस्ट्रीजला विकून आपल्यासोबत केलेल्या करारांचे उल्लंघन केले आहे, असे म्हणणे अमेझॉनने मांडले आहे. हा व्यवहार ‘जैसे थे’ स्थितीत ठेवण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नुकतेच दिले आहेत. त्या आदेशाविरोधात अमेझॉनने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळे आता अमेझॉन आणि फ्युचर ग्रुप यांच्यातील वाद भविष्यात आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहे. (amazon gone to supreme court against future company)

फ्युचर ग्रुपने ऑगस्ट महिन्यात रिटेल, होलसेल व आणखी काही बिझनेस 24,713 कोटी रुपये एवढ्या किंमतीत रिलायन्स इंडस्ट्रीला विकले. दिल्ली उच्च न्यायालयानेही अमेझॉनच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र सोमवारी खंडपीठाने आधीचा निर्णय रद्द करीत अमेझॉनला झटका दिला. त्यामुळे अमेझॉनने आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. खंडपीठाने अमेझॉनलाही नोटीस बजावत 26 फेब्रुवारीपर्यंत त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे. यानंतर याप्रकरणाची सुनावणी घेण्यात येईल. सिंगापूरच्या आर्बिट्रेशन न्यायालयानेही ऑक्टोबर महिन्यात अॅमेझॉनच्या बाजूने निकाल दिला होता. आर्बिट्रेशन न्यायालयाने फ्युचर ग्रुपला कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण किंवा विक्रीस तसेच निधी उभारण्यासाठी शेअर्स जारी करण्यावर बंदी घातली होती.

अ‍ॅमेझॉनने 2019 मध्ये फ्यूचर कूपनमध्ये 49 टक्के भागिदारीसाठी दोन हजार कोटी रुपयांचा व्यवहार केला होता. यावेळी केलेल्या करारामध्ये फ्यूचरला दुस-या कोणत्याही कंपनीसोबत करार करण्यापूर्वी अ‍ॅमेझॉनला माहिती देणे आवश्यक आहे, असे म्हटले होते. परंतु, फ्यूचरने कोणतीही कल्पना न देता करार केल्याचे अ‍ॅमेझॉनचे म्हणणे आहे. (amazon gone to supreme court against future company)

इतर बातम्या

आता स्पर्श न करता काढा एटीएममधून पैसे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

व्हॅलेंटाईनआधी शाओमीने या वस्तूची किंमत केली कमी, आता 3 हजार रुपयांनी स्वस्त मिळणार ही वस्तू

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.