शिक्षणासाठी US ला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, यंदा बंपर VISA जारी होणार
भारतातील अमेरिकन मिशनने गुरुवारी देशभरात 8 वा वार्षिक 'स्टुडंट व्हीसा डे' साजरा केला. यावेळी नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबई येथील दुतावास अधिकाऱ्यांनी विद्यार्थी व्हीसासाठी आलेल्या अर्जदारांच्या मुलाखती घेतल्या.
अमेरिकेत जाणाऱ्या शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीयांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. यावेळी अमेरिका बंपर संख्येने व्हीसा जारी करणार आहे. गेल्या वर्षी अमेरिकेने रेकॉर्डब्रेक 1,40,000 विद्यार्थ्यांना व्हीसा मंजूर केला आहे. यानंतर भारतस्थित अमेरिका वाणिज्य दूतावास यंदा भारतीय विद्यार्थ्यांकडून येणाऱ्या अर्जाचा निपटारा करण्यासाठी सज्ज आहे. दूतावासातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनूसार यंदा गेल्यावर्षी एवढे किंवा त्याहून अधिक एज्यूकेशन व्हीसा जारी करणार आहेत. त्यामुळे अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्यांना फायदा होणार आहे.
भारतातील अमेरिकन मिशनने देशभरात 8 वा वार्षिक ‘स्टुडंट व्हीसा डे’ साजरा झाला. नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबईतील दुतावास अधिकाऱ्यांनी विद्यार्थी व्हीसासाठी आलेल्या अर्जदारांच्या मुलाखती घेतल्या. दिल्लीतील अमेरिकन दूतावासात सकाळपासूनच विद्यार्थ्यांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसत होत्या. मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी अमेरिकेतील विविध विद्यापीठांमध्ये शिकतात आणि गेल्यावर्षी भारतातील अमेरिकन वाणिज्य दूतावासाने 1,40,000 पेक्षा जास्त उमेदवारांना विद्यार्थी व्हीसा जारी केले होते. इतर कोणत्याही देशापेक्षा अमेरिकेने सर्वाधिक स्टुडंट व्हीसा जारी केले आहेत.
एका दिवसात 4 हजार विद्यार्थ्यांच्या मुलाखती
दिवसभरात सुमारे 4,000 विद्यार्थ्यांच्या स्टुडंट व्हीसासाठी मुलाखती घेतल्या जातील असा अंदाज असल्याचे अमेरिकन दूतावासाचे कार्यवाहक कौन्सुल जनरल सय्यद मुजतबा अंद्राबी यांनी सांगितले. विद्यार्थी व्हीसाला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. दोन्ही देशांमधील शैक्षणिक देवाण घेवाण हे या प्रशासनाच्या आणि आमच्या ध्येयाच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहे. गेल्यावर्षी, आम्ही विक्रमी संख्येने स्टुडंट व्हीसा जारी केले होते, ज्याची संख्या 1,40,000 होती, जो एक विक्रम आहे. 2024 मध्ये विद्यार्थी व्हीसाच्या संभाव्य वाढीबद्दल ते म्हणाले की ते गेल्यावर्षीच्या संख्येत असतील किंवा जास्त देखील असतील असे त्यांनी सांगितले.
स्टुडंट व्हीसाला अमेरिकेचे प्राधान्य
अमेरिका स्टुडंट व्हीसाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. गेल्या तीन वर्षांत अमेरिकेत शिकण्यासाठी निवडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 2023 मध्ये अमेरिकन मिशन्सनी ‘2018, 2019 आणि 2020 मध्ये जारी केलेल्या एकूण विद्यार्थी व्हीसांपेक्षा जास्त व्हीसा जारी केले होते. ही ‘अभूतपूर्व वाढ’ विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी यूएस सरकारची कठीबद्धता दर्शवते. युएस मिशन अंतर्गत 2021 ते 2023 दरम्यान व्हीसाच्या मागणीत 400 टक्के वाढ झाली आहे.