महाराष्ट्रात कडक Lockdown ची शक्यता, रेल्वे सेवा बंद होणार? Indian Railway म्हणते…
वेगाने प्रसार होणाऱ्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशातील अनेक राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लादले जात आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन (Maharashtra lockdown) आवश्यक असल्याचा पर्याय सरकारकडे आहे. मात्र त्याबाबत विरोधी पक्षांची भूमिका काय हे जाणून मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. अशातच आता रेल्वेदेखील बंद होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Amidst the apprehension of Lockdown, will the trains be stopped; Indian Railway replied)
वेगाने प्रसार होणाऱ्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशातील अनेक राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लादले जात आहेत. कुठे नाईट कर्फ्यू आहे, तर कुठे वीकेंड लाकडाऊन (शनिवारी-रविवारी) घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर पुन्हा एकदा रेल्वेगाड्या बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याबाबत रेल्वेने (Indian Railways) अधिकृत प्रतिक्रिया जाहीर केली आहे.
रेल्वे बंद होणार नाही
रेल्वे मंत्रालयाने निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की, रेल्वे सेवा थांबविण्याचा किंवा गाड्यांची संख्या कमी करण्याचा कोणताही प्लॅन नाही. ज्यांना ट्रेनमध्ये प्रवास करायचा आहे ते करू शकतात. त्यांना ट्रेन मिळण्यात काहीच अडचण येणार नाही. स्थलांतरित मजुरांच्या स्थलांतरामुळे ट्रेनमध्ये गर्दी झाल्यास आम्ही त्वरित गाड्यांची संख्या वाढवू. उन्हाळ्यातील गर्दी पाहता आम्ही आधीच काही गाड्या सुरू केल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.
रेल्वे स्थानकांवरील गर्दीची अफवा
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा म्हणाले की, पहिल्या लॉकडाऊन दरम्यानचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये रेल्वे स्थानकांवर प्रवासी मजुरांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. ते म्हणाले की, हे व्हिडिओ पाहून लोक घाबरून आहेत. हे व्हिडिओ आजचे नाहीत. सध्या रेल्वे स्थानकांवर नाममात्र गर्दी आहे.
Some old videos showing crowd at various stations are making rounds in social media. Some news reports also falsely mention that there is mass movement of people.
We appeal everyone to avoid sharing such videos. People are requested not to believe in such rumours. https://t.co/xeB0XcYgyZ
— Ministry of Railways (@RailMinIndia) April 9, 2021
मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाही
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मध्य रेल्वेचे प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी सांगितले की, आजपासून मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), कल्याण, ठाणे, दादर, पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री थांबविण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
व्हॅक्सीन घेतल्यानंतरही कोरोना का होतो?; अदर पूनावाला यांनी दिलं ‘हे’ कारण
(Amidst the apprehension of Lockdown, will the trains be stopped; Indian Railway replied)