…आताही पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच बसणार; आगामी निवडणुकीत भाजप विक्रम नोंदविणार; ‘या’ दिग्गज नेत्यांनं स्पष्टच सांगितलं

अवघ्या अडीच वर्षांत सरकारने 86 हजार सरकारी नोकऱ्या दिल्या असून उर्वरित नोकऱ्या आगामी काळातील 6 महिन्यांमध्ये देण्यात येतील असंही त्यांनी यावेळी अश्वासन दिले आहे.

...आताही पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच बसणार; आगामी निवडणुकीत भाजप विक्रम नोंदविणार; 'या' दिग्गज नेत्यांनं स्पष्टच सांगितलं
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 11:19 PM

गुवाहाटी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या आसामच्या दौऱ्यावर आहेत. येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी सांगितले की, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्या वेळी ते पंतप्रधान पदावर विराजमान होतील. तसेच यावेळी काँग्रेसच्या जागाही आता कमी होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी अमित शाह यांनी सांगितले की, 44 हजार 703 जणांना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत.

अमित शाह यांनी आज बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस अत्यंत नकारात्मक वृत्तीचे राजकारण करते असे त्यांनी म्हटले आहे.

या नकारात्मक वृत्तीमुळे काँग्रेसने नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पुढील लोकसभा निवडणुकीत भाजप संपूर्ण देशात 300 हून अधिक जागा जिंकणार असल्याचे सांगत काँग्रेस विरोधी पक्षाचा दर्जाही गमावणार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

शाह यांनी सांगितले की, काँग्रेसच्या नकारात्मक राजकीय धोरणामुळे काँग्रेस नवीन संसद भवनाचे उद्घाटन द्रौपदी मुर्मूच्या माध्यमातून व्हावे अशी सबब ते पुढे करत बहिष्कार टाकत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी हे ही सांगितले की, या प्रकारची उदाहरणे ही काँग्रेस आणि विरोधी पक्षाची ज्या ज्या राज्यात सरकार आहेत त्या त्या राज्यात अशा प्रकारची मानसिकता या राजकीय पक्षांची असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

यावेळी शाह यांनी काँग्रेसच्या राजवटीची आठवण करून देत काँग्रेसच्या पंतप्रधानांना संसदेत बोलू दिले जात नव्हते. भारतीय जनतेने हा अधिकार पंतप्रधान मोदींना दिला आहे असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

पंतप्रधानांचा आदर न करता त्यांनी जनतेच्या निकालाचा अपमान केला आहे. 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार 1 लाख सरकारी नोकऱ्या देणार असल्याचेही त्यांनी यावेळी अश्वासन भाजपने आसामच्या जनतेला दिले होते, असे अमित शहा यांनी सांगितले.

अवघ्या अडीच वर्षांत सरकारने 86 हजार सरकारी नोकऱ्या दिल्या असून उर्वरित नोकऱ्या आगामी काळातील 6 महिन्यांमध्ये देण्यात येतील असंही त्यांनी यावेळी अश्वासन दिले आहे.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.