कोरोना संसर्गामुळे गैरहजेरी, भूमिपूजनानंतर अमित शाह यांची रुग्णालयातून पहिली प्रतिक्रिया
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिपूजनानंतर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली (Amit Shah on Ayodhya Ram Mandir Bhoomi Pujan).
नवी दिल्ली : कोरोना संसर्ग झाल्याने राम मंदिर भूमिपूजनाच्या ऐतिहासिक कार्यक्रमात उपस्थित राहू न शकलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिपूजनानंतर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे (Amit Shah on Ayodhya Ram Mandir Bhoomi Pujan). राम मंदिराच्या आंदोलनाच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, “राम मंदिराची उभारणी हे असंख्य रामभक्तांच्या शतकोनशतकांच्या त्याग, संघर्ष, तपस्या आणि बलिदानाचं फळ आहे. आजच्या दिवशी सनातन संस्कृतीच्या या अमुल्य ठेव्यासाठी ज्यांनी संघर्ष केला त्या सर्वांना मी नमन करतो.” त्यांनी
आज (5 ऑगस्ट) अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन पार पडले. याविषयी बोलताना गृह मंत्री अमित शाह म्हणाले, “आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद आहे. प्रभु श्री राम यांच्या जन्मभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भव्य राम मंदिराचं भूमिपूजन आणि पायाभरणी झाली. यामुळे महान भारतीय संस्कृती आणि सभ्यतेच्या इतिहासाचा एक सुवर्ण अध्याय लिहिला आहे. ही एका नव्या युगाची सुरुवात आहे.”
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“अयोध्येत राम मंदिर उभारणे ही जगभरातील हिंदूंची शतकानुशतकांची श्रद्धा आहे. आज पंतप्रधान मोदी आणि श्री राम जन्मभूमि ट्रस्टने भूमिपूजन करुन कोट्यावधी लोकांच्या श्रद्धेचा सन्मान केला आहे. यासाठी मी त्यांचे आभार मानतो,” असंही अमित शाह म्हणाले.
भारताच्या आत्म्यात भगवान रामाचे आदर्श आणि विचार
अमित शाह म्हणाले, “भगवान रामाचे आदर्श आणि विचार भारताच्या आत्म्यात वसतात. त्यांचं चरित्र आणि जीवन दर्शन भारतीय संस्कृतीचा आधार आहे. राम मंदिर निर्माणामुळे अयोध्या पुन्हा एकदा जगात संपूर्ण वैभवासह उभी राहिल. धर्म आणि विकासाच्या समन्वयाने रोजगाराच्या नव्या संधी तयार होतील. या अविस्मरणीय दिवसासाठी मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो. मोदी सरकार भारतीय संस्कृती आणि त्यांच्या मूल्यांच्या रक्षणासाठी नेहमीच कटिबद्ध असेल.”
संबंधित बातम्या :
संबंधित व्हिडीओ :
Amit Shah on Ayodhya Ram Mandir Bhoomi Pujan