ओवेसींवर गोळ्या झाडणारे हल्लेखोर कोण? किती जण घेतले ताब्यात? अमित शाह यांनी दिलं उत्तर
ऐन उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या हल्ल्याने देशाला हादरवरून सोडले होते. याबाबत बोलताना अमित शहा राज्यसभेत म्हणाले, ओवेसी कार्यक्रम संपवून दिल्लीत परतत होते. यादरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. ही घटना तीन साक्षीदारांनीही पाहिली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात एमआयएम खासदार असदुद्दीने ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर झालेल्या गोळीबाराबाबत (Hapud Firing) अमित शाह(Amit Shah) यांना आज राज्यसभेत उतर दिले आहे. ऐन उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या हल्ल्याने देशाला हादरवरून सोडले होते. याबाबत बोलताना अमित शहा राज्यसभेत म्हणाले, ओवेसी कार्यक्रम संपवून दिल्लीत परतत होते. यादरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. ही घटना तीन साक्षीदारांनीही पाहिली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येत आहे. असेही ते म्हणाले. तसेच ओवेसी यांचा हापूर जिल्ह्यात कोणताही पूर्वनियोजित कार्यक्रम नव्हता, त्यांच्या आंदोलनाची कोणतीही माहिती यापूर्वी जिल्हा नियंत्रण कक्षाला पाठवण्यात आली नव्हती, असे म्हणत त्यांनी काही महत्वाच्या मुद्द्यांवर बोट ठेवलं आहे.
ओवेसींना सुरक्षा नाकारली-अमित शाह
तसेच घटनेनंतर ते सुखरूप दिल्लीत पोहोचले. ओवेसींनी झेड प्लस सुरक्षा घेण्यास नकार दिल्याचे अमित शाह यांनी राज्यसभेत केलेल्या वक्तव्यादरम्यान सांगितले. माझे आवाहन आहे की त्यांनी संरक्षण घ्यावे जेणेकरून पुन्हा अशी घटना होणार नाही, असेही अमित शाह म्हणाले. तसेच ओवेसींनी बुलेटप्रुफ कार नाकरल्याचेही त्यांनी सांगितले. असदुद्दीन ओवेसी मेरठहून प्रचार सभेनंतर परतत असताना हापूर टोल प्लाझा येथे त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. यामध्ये 3-4 गोळ्या झाडण्यात आल्या त्या कारवरील खुणा ओवेसींनी स्वतः ट्विट करून दाखवल्या आहेत. हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते. त्यानंतर पिलखुवा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.
दोन्ही आरोपींची ओळख पटली
कारवर गोळीबाराच्या घटनेनंतर केंद्र सरकारने असदुद्दीन ओवेसी यांना झेड श्रेणीची सुरक्षा देण्याचे बोलले होते, मात्र ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. मात्र, AIMIM नेते असदुद्दीन ओवेसी यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिल्याचे बोलले होते. स्वखर्चाने बुलेट प्रुफ वाहनाची मागणी करणार असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले होते. ओवेसी यांच्याकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे आणि त्या परवान्याच्या आधारे ग्लॉक शस्त्रे ठेवण्याची परवानगी घेणार आहेत. ओवेसींच्या गाडीवर हल्ला करणारे दोन्ही तरुण आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत. पहिल्या हल्लेखोराला ओवेसींच्या कारच्या चालकाने धडक दिली आणि खाली पाडले, त्याला पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर अटक केली. दुसरीकडे, दुसऱ्या आरोपीने गाझियाबादमधील पोलीस ठाण्यात जाऊन सरेंडर केले. दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शुभम आणि सचिन अशी दोघांची नावं असल्याची माहिती देण्यात आली आहे.