गुन्हेगारी बाबत राज्य आणि केंद्राची जबाबदारी काय?; अमित शहांनी उपायच सांगितला…
देशाच्या सीमेपलीकडून करण्यात येणाऱ्या गुन्हेगारीविषयी केंद्रानी आणि राज्यांनी ठोस पावले उचलणे गरजचे आहे.
नवी दिल्लीः देशाच्या सीमेपलीकडे असणाऱ्या गुन्हेगारी समूळ उच्चाटन करुन टाकणे हीच केंद्र आणि राज्य सरकारची सामूहिक जबाबदारी असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज सांगितले. आपल्या राज्यघटनेत कायदा आणि सुव्यवस्था हा राज्यांचा विषय आहे, पण सीमेपलीकडे घडणारे गुन्हे किंवा सीमेबाहेरील गुन्ह्येगारी आपण थांबवू शकतो. मात्र त्यासाठी सर्व राज्यांनी एकत्र बसून त्यावर विचार विनिमय केला पाहिजे.
त्यासाठी आणि एक समान धोरण राबवले गेले पाहिजे तरच अशा सीमेबाहेरील गुन्हेगारीवर आवर घालता येईल असंही त्यांनी सांगितले.
अमित शहा म्हणाले की, देशाच्या सीमेपलीकडून करण्यात येणाऱ्या गुन्हेगारीविषयी केंद्रानी आणि राज्यांनी ठोस पावले उचलणे गरजचे आहे.
त्यांच्यावर जर सामुहिक आणि संयुक्तपणे कारवाई केली गेली तर देशातील वातावरण चांगले राखता येणार आहे. अशा कारवायांवर संयुक्त कारवाया केल्या गेल्या तरच देशात होणारी घुसखोरी थांबली जाईल असंही त्यांनी सांगितले.
अमित शहा यांनी बोलताना सांगितले की, जम्मू-काश्मीर असो की ईशान्य किंवा अंमली पदार्थांची तस्करी असो. यांच्यावर कारवाई करण्यात मोदी सरकार यशस्वी ठरले आहे.
गृहमंत्र्यांनी सांगितले की, दहशतवादविरोधी धोरणांतर्गत सर्व राज्यांमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणांची कार्यालयं असणार आहेत. आपल्या देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत मानली जाते.
त्यामुळे देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यासाठी आपले 35 पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांनी बलिदान दिले आहे.
अमित शहा यांनी सांगितलेल्या केंद्र आणि राज्याच्या सुरक्षिततेसंदर्भात जबाबदाऱ्यांचे पालन केले तर राज्यासह देश सुरक्षित राहिल असं मतही त्यांनी व्यक्त केले.