WITT 2024 | देशातील या 4 नासूरांना पंतप्रधानांनी संपवलं, अमित शाह काय म्हणाले ?
WITT सत्ता संमेलन : देशात समान नागरिक कायदा हा योग्य वेळी नक्की येईल, हा आमचा पहिल्यापासूनच नारा आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. Tv9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्ता संमेलनादरम्यान ते बोलत होते.
नवी दिल्ली | 28 फेब्रुवारी 2024 : Tv9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’या ग्लोबल समिटमध्ये सहभागी झालेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विरोधी पक्षावर जोरदार बरसले. आमच्या पंतप्रधानांनी या देशाचं लोकशाही मजबूत करण्याचं काम केलं. घराणेशाही, भ्रष्टाचार, जातीवाद आणि तुष्टीकरणामुळे कोणताही देश विकसित होऊ शकत नाही. आमच्या सरककारने या चार नासुरांचा खात्मा करण्याचं काम केलं, असेही अमित शाह म्हणाले. देशातील प्रत्येक निवडणूक ही या चार नासुरांनी ग्रस्त होती, पण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली या नासुरांचा नाश करण्यात आला. हे नासुर संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मेंस स्थापित केले, असेही अमित शाह म्हणाले.
एके दिवशी आम्ही या देाशाला नक्षलवादापासूनही मुक्त करू, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. नक्षलवाद हा देखील या देशातील एक नासूर आहे. आजच्या काळात नक्षलवाद 72 टक्के संपला आहे, येत्या काळात उर्वरित नक्षलवादही संपुष्टात येईल. एवढंच नव्हे तर दहशतवादही कोणत्याही परिस्थितीत संपवू असेही ते म्हणाले. देशाच्या फायद्यासाठी एफआरसीए कायदा आणण्यात आला आहे. नव्या कायद्यानंतर देशभरात मोठा बदल पहायला मिळेल. देश तोडण्यासाठी मिळणारे फंडिंग (आर्थिक रसद) तोडणं अत्यंत गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
गरज पडल्यास आणखी कठोर निर्णय घेऊ
जो देशाचा विकास करेल, जो देशाचे रक्षण करेल तोच (पक्ष) देशावर राज्य करेल ( सत्ता मिळेल.) आमच्या सरकारने असे अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. यापुढेही (भविष्यात) जिथे जिथे गरज पडेल तिथे आम्ही कठोर निर्णय घेऊ. राजकारणात आम्ही परिणामांची काळजी करत नाही. व्होट बँकेसाठी आम्ही राजकारण करत नाही. आम्ही देशहितासाठी काम करतो, पक्षहितासाठी नव्हे, असेही अमित शाह यांनी स्पष्ट केलं.
इंडिया आघाडीवर केला प्रहार
या समिटमध्ये बोलताना अमित शाह यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. आजच्या काळात काँग्रेसचे संपूर्ण विघटन झालं आहे. काँग्रेसला आपले कुटुंब सांभाळता येत नाही आणि त्यामुळेच त्यांचे नेते पळून जात आहेत. त्याचवेळी अमति शाह यांनी इंडिया आघाडीच्या बेनवाबाबवरूनही टीका केली. खऱ्या अर्थाने कुठेही इंडिया आघाडी नाही, कुठेही युती नाही. बंगालमध्ये तीन आणि केरळमध्ये दोन भारतीय पक्ष आमनेसामने आहेत. कोणत्याही ठिकाणी युती झालेली नाही.
विरोधकांना फक्त घराणेशाहीची चिंता
अमित शाह यांनी घराणेशाीवरूनही टीका केली. विरोधी पक्षांना फक्त त्यांच्या कुटुंबाला पुढे नेण्याची चिंता आहे. भारताची कोणालाच चिंता नाही. राहुल गांधी 21व्यांदा यशस्वी व्हावेत, हेच सोनिया गांधींच्या आयुष्याचे ध्येय आहे. आपल्या मुलाने पुढे जावे, हा उद्धव ठाकरेंचा उद्देश आहे. आपला मुलगा पुढे जावा, हाच स्टॅलिन यांचाही उद्देश आहे. यात आघाडी कुठे आहे. या लोकांना आपल्या कुटुंबाला सत्तेत आणायचं आहे. त्यासाठी हा परिवारवादी जमावडा आहे. संत्र्यासारखी आघाडी आहे. या संत्र्याची एक एक पाकळी निघून जाणार आहे. मतमोजणीच्या दिवसापासूनच यांच्यात फूट पडेल, असे णित शाह म्हणाले.
गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केले, आम्ही तिहेरी तलाक रद्द केला, कलम 370 रद्द केले, महिला आरक्षण विधेयक आणले, 160 वर्षे जुना ब्रिटिश कायदा रद्द केला आणि त्यानंतर अयोध्येत राम मंदिराची प्रतीक्षाही अखेर पूर्ण झाली. 2014 नंतर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात जे मोठे बदल झाले आहेत त्याचा संपूर्ण देश साक्षीदार आहे, असे णित शाह म्हणाले.