Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वारकरी संप्रदाय आणि रामानुजाचार्याच्या सिद्धांताचा संबंध काय?; अमित शहांनी दिला दाखला

केद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज स्टॅच्यू ऑफ इक्लॅलिटीला (Statue Of Equality) भेट दिली. यावेळी त्यांनी सांप्रदायिक मुद्यांवरून विविध दाखले दिले आहेत.

वारकरी संप्रदाय आणि रामानुजाचार्याच्या सिद्धांताचा संबंध काय?; अमित शहांनी दिला दाखला
वारकरी सांप्रदयाचा अमित शाह यांच्याकडून दाखला
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 8:13 PM

हैदराबाद : केद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज स्टॅच्यू ऑफ इक्लॅलिटीला (Statue Of Equality) भेट दिली. यावेळी त्यांनी सांप्रदायिक मुद्यांवरून विविध दाखले दिले आहेत. यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले. अनेक संप्रदायाचा मूळापासून अभ्यास केल्यास रामानुजाचार्यांचा (Ramanuja) विशिष्ठद्वैत असल्याचंच दिसून येतं. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाच्या मूळाशी गेला तर रामानुजाचार्यांच्या विशिष्ठा अद्वैतचा सिद्धांत दिसून येईल. राजस्थान आणि गुजरातच्या वल्लभ संप्रदायात गेल्यास त्यातही तेच सापडेल. मध्यभारत आणि मणिपूरच्या चैतन्य संप्रदायात गेल्यास त्याच्या मूळाशीही विशिष्ठा अद्वैतच सापडेल. आसाममध्ये शंकर देव आणि महादेव देवाच्या उपदेशात गेल्यास त्यातही तुम्हाला हाच सिद्धांत दिसेल. एका व्यक्तीने सिद्धांत दिला. त्यात समानता होती. रामानुजाचार्य हे कधी आसाम, मणिपूरला गेले नसतील. पण प्रत्येक ठिकाणी भक्ती संप्रदायाचे लोक भेटतात. असे अनेक दाखले आज अमित शाह यांनी दिले आहेत.

संकटातही सनातन धर्म टिकून राहिला.

पुढे बोलताना शाह म्हणाले की, रामाणय महाभारतापासून ते आजपर्यंत सनातन धर्मात चढउतार आले. पण तरीही सनातन धर्म टिकून राहिला. जेव्हाही सनातन धर्मावर संकट आलं तेव्हा त्याची ज्योत पुन्हा प्रज्वलित झाली. शंकराचार्यानंतर रामानुजाचार्यांनी मोठं काम केलं. आदी शंकराचार्याने सर्व मतमतांतरे एकत्र करून देशाला एकत्र केलं. सर्व मते एका छत्रछायेखाली आणले. रामनाजुचार्यांनी जीवन कवनाने सर्व देशाला सनातन धर्माशी जोडण्याचं काम केलं. कुरिवाज, कुप्रथा त्यांनी आपल्या कर्माने बदलल्या. सनातन धर्मात असं काय आहे की त्याची धारा निरंतर वाहत असते. त्यातील अमृततत्त्व काय आहे? धर्माचाही अभ्यास केला तर सनातन धर्मात मीच सत्य आहे हा अहंकार नाही. आपल्या शास्त्रामध्ये खंडनमंडनची व्यवस्था आहेच. पण चांगलं ते स्वीकारण्याचीही वृत्ती आहे. त्यामुळेच सनातन धर्म पुढे गेला. आज आपण खूप मागे आहोत असं वाटत असेल. पण सर्व धर्माच्या गुरुंना पाहिल्यावर ही यात्रा कधी ना थांबेल ना कधी थकेल असा विश्वास आहे. ही यात्रा दिग्विजयी होऊ संपूर्ण जगात ज्ञानाचा प्रसार करेल. असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही धर्माचा अनुयायी इथे येतो

संतांचा स्वभाव असतो सुक्ष्म लोकांचं गुणगाण गाऊन मोठं करणं. मी आज चेतना आणि उत्साह घेऊन पुढे जाणार आहे. ज्यांच्यात संवेदना असते धर्म आणि समाजासाठी काही करायची तळमळ असते, इच्छा असते अशा लोकांना काम करण्याची चेतना आणि उत्साह जीयरास्वामी देत आहेत. तुम्ही रामानुजाचार्यांच्या स्मारकातून हीच प्रेरणा मिळेल. कोणत्याही संप्रदायाचा अनुयायी असेल तर त्याला इथे येण्याची प्रेरणा मिळेल. रामानुजाचार्यांच्या जन्माच्या एक हजार वर्षानंतर एवढा मोठा सोहळा होत आहे. वेदांचे मूळ वाक्य बाहेर काढून त्यांनी अनेक परंपरा मोडीत काढून समाजासमोर मांडले. आज एक हजारवर्षानंतरही तोच संदेश मिळत आहे. मोदींच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं. मी हा पुतळा पाहिला. दुरून पाहिल्यानंतर ही प्रतिमा अद्भूत वाटते. चित्त शांत करते आणि आनंददायी वाटते. पण जवळ गेल्यावर हॉलमध्ये रामानुजाचार्यांचे संदेश सर्व भाषेत कोरले आहेत. ते वाचत वाचत पुढे जात असतानाच भव्य मूर्तीचं दर्शन होतं. रामानुजाचार्य यांनीच संपूर्ण देशाला समतेचा संदेश दिला हा संदेश युगानुयुगे राहील, असेही शाह म्हणाले.

Hijab controversy: राज्यातील शाळा, महाविद्यालये तीन दिवस बंद; कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय

आदि शंकराचार्यांएवढंच रामानुजाचार्यांचं कार्य अद्भभूत; ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ पाहिल्यावर मनाला शांती मिळते : अमित शहा

Karnataka Hijab| शैक्षणिक संस्थेत तिरंग्याच्या जागी भगवा फडकवला, जय श्रीरामचा नारा, कलम 144 लागू!