अपघाताने प्रेमी जोडप्याला बनविले पती-पत्नी; अचंबित करणारा असा एक विवाह
मुलगा व मुलगी दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. पण, कुटुंबीयांपासून ही बाब लपवून ठेवण्यात आली होती. बाईकने दोघेही फिरायला जात होते. तेवढ्यात त्यांची बाईक कारला आदळली.
नवी दिल्ली : ही स्टोरी आहे बिहारच्या अरवलमधील. एक मुलगा गर्लफ्रेंडला घेऊन बाईकने फिरायला गेला. एक कार बाईकला आदळली. यात मुलगा व मुलगी दोघेही जखमी झाले. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू झाली. बातमी घरापर्यंत पोहचली. त्यामुळं रुग्णालयातचं त्यांचं लग्न (Hospital Marriage)लावून दिलं गेलं. बिहारमधील अरवल येथे एक वेगळं लग्न झालं. याची चर्चा जिल्हाभर सुरू झाली. येथे फिल्मी स्टाईलनं एका प्रेमी जोडप्याचं (Lover Couple) रुग्णालयात लग्न लागलं. दोघांनीही एकदुसऱ्याच्या गळ्यात माळ टाकली. या विवाह सोहळ्यात रुग्णालयातील कर्माचारी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सहभागी झाले.
ठाकूर बिगहा गावातील नीरज कुमार आपली गर्लफ्रेंड कौशल्या कुमारीला बाईकवर बसवून बैदराबाद बाजारात फिरण्यासाठी गेला. घरी परत येत असताना त्यांची बाईक एका कारवर धडकली. यात मुलगा आणि मुलगी दोघेही जखमी झाले.
प्रेमाची कुणकुण घरी पोहचली
अपघातानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांच्या प्रेमाची चर्चा त्यांच्या घरापर्यंत पोहचली. दोघांचेही कुटुंबीय रुग्णालयात पोहचले. दोघेही जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी त्यांचं लग्न लावून दिलं.
कुटुंबीयांनी लावून दिलं लग्न
मुलगा व मुलगी दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. पण, कुटुंबीयांपासून ही बाब लपवून ठेवण्यात आली होती. बाईकने दोघेही फिरायला जात होते. तेवढ्यात त्यांची बाईक कारला आदळली. प्रेमी जोडप्यांनी ही कल्पनाही केली नव्हती की, कुटुंबीय त्यांचं लग्न लावून देतील. दोघांचही लग्न चर्चेचा विषय होत आहे.
या घटनेमुळं का होईना दोघांचं प्रेमप्रकरण समोर आलं. कुटुंबीयांनी त्यांचं लग्नचं लावून दिलं. त्यामुळं अपघात झाला असला तरी दोघेही आनंदी आहेत. सुखी संसाराची त्यांनी सुरुवात केली आहे.