Uttarakhand Earthquake: उत्तराखंडमध्ये भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर 3.4 मोजली गेली तीव्रता

नेपाळच्या भूकंपाची घटना ताजी असतानाच आज उत्तराखंडमध्ये देखील भूकंप आला. हा भूकंप रिश्टर स्केलवर 3.4 इतका मोजण्यात आला आहे.

Uttarakhand Earthquake: उत्तराखंडमध्ये भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर 3.4 मोजली गेली तीव्रता
भूकंप Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 12, 2022 | 7:08 PM

नवी दिल्ली, राजधानी दिल्लीपासून  212 किमी अंतरावर उत्तराखंडच्या पौरी गढवालमध्ये शनिवारी संध्याकाळी भूकंपाचे (Uttarakhand Earthquake) धक्के जाणवले. उत्तराखंडमधील या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 इतकी मोजण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 5 किमी खाली असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपामुळे जीवित व वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. शनिवारी महाराष्ट्रातील नाशिकमध्येही भूकंपाचे धक्के (Nashik Earthquake)  जाणवले. सकाळी 9.38 वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३ एवढी होती. नाशिकच्या भूकंपात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.

नुकताच नेपाळमध्ये झाला भीषण भूकंप

दोन दिवसांपूर्वी भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये 6.3 रिश्टर स्केलचा भीषण भूकंप झाला होता. नेपाळ भूकंपाचा केंद्रबिंदू भारताच्या उत्तर प्रदेश राज्याची राजधानी लखनौपासून 266 किमी अंतरावर होता, मात्र त्याचे धक्के राष्ट्रीय राजधानी दिल्लीपर्यंत जाणवले.

का होतात भूकंप?

पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे भूकंप होतात. टेक्टोनिक प्लेट्स नेहमी पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली हळू हळू फिरत असतात, परंतु कधीकधी त्यांच्या काठावरचे क्षेत्र अडकते आणि घर्षण तयार होते. या घर्षणातून बाहेर पडणारी ऊर्जा तरंगांच्या रूपात पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचते आणि भूकंपाची कंपन आपल्याला जाणवते.

हे सुद्धा वाचा

2015 मध्ये नेपाळमध्ये भीषण भूकंप झाला होता

अनेक भूवैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की नेपाळ आणि हिमाचल दरम्यान एक क्षेत्र आहे, जिथे अनेक वर्षांपासून ऊर्जा उत्सर्जित होत नसल्याने कधीही प्राणघातक स्वरूपाचा मोठा भूकंप होऊ शकतो. त्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 8 पेक्षा जास्त असू शकते, असे भूवैज्ञानिकांचे म्हणणे आहे. एप्रिल 2015 मध्ये नेपाळमध्ये 7.8 तीव्रतेचा भयानक भूकंप झाला होता आणि 9 हजार लोकांचा त्यात बळी गेला होता. अशा परिस्थितीत 8 पेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप खूप विनाशकारी ठरू शकतो.

उत्तराखंडमध्ये 10 वर्षात 700 भूकंपांची नोंद

टीव्ही 9 शी केलेल्या संभाषणात भूगर्भशास्त्रज्ञ अजय पाल यांनी सांगितले होते की, गेल्या 10 वर्षांत भारतातील उत्तराखंडच्या डोंगराळ राज्यात 700 भूकंपांची नोंद झाली आहे. त्यांची तीव्रता 4 पेक्षा कमी असली तरी, येत्या काळात मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.