ज्याच्याशिवाय मतदान शक्यच नाही अशी एक वस्तू फक्त आपल्याच देशात होते तयार, जगातील 90 टक्के देश आहेत भारतावर अवलंबून  

येत्या वीस तारखेला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. तुम्हाला माहिती आहे का? की निवडणुकीसाठी लागणाऱ्या एका महत्त्वाच्या गोष्टीचा भारत हा एक प्रमुख पुरवठादार देश आहे. जगातील जवळपास नव्वद टक्के देश त्यासाठी भारतावर अवलंबून आहेत.

ज्याच्याशिवाय मतदान शक्यच नाही अशी एक वस्तू फक्त आपल्याच देशात होते तयार, जगातील 90 टक्के देश आहेत भारतावर अवलंबून  
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 4:11 PM

महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. राज्यात 2019 नंतर दोन बड्या पक्षात फूट पडली. या फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राज्यात सध्या जी काही गुंतागुतीची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या सर्व पार्श्वभूमीवर आता मतदारराजा आपलं मत कोणाच्या पारड्यात टाकणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान मतदारांना घटनेनं मतदानाचा अधिकार दिला आहे. आपल्या एका मताच्या जोरावर संपूर्ण देशाची, राज्याची सत्ता उलथून टाकण्याची ताकत तेथील नागरिकांमध्ये असते. भारातमध्ये वयाचे 18 वर्ष पूर्ण केलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेता येतो. आपल्या आवडत्या उमेदवाराला मतदान करता येतं. मात्र घटनेनं केवळ एकदाच मतदानाचा अधिकार दिला आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही निवडणुकीमध्ये फक्त एका उमेदवाराला एकच मत देता येतं.

मतदारांनी एकापेक्षा अधिकवेळा मतदान करू नये, मतदान प्रक्रियेमध्ये काही गैरप्रकार होऊ नये हे टाळण्यासाठी ज्या व्यक्तीने मतदान केलं त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्याची पद्धत आहे, ही शाई म्हणजे तुम्ही मतदान केल्याचा पुरावा आहे. अनेक जण आपल्याला हाताच्या तर्जनीला लावलेल्या शाईसोबत सोशल मीडियावर सेल्फी देखील पोस्ट करतात. भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये मतदान झाल्यानंतर हाताच्या बोटाला शाई लावण्याची पद्धत आहे. मग तुम्ही हा विचार कधी केलाय का ही शाई नेमकी कशी तयार होते? कुठे तयार केली जाते? त्याचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

निवडणुकीसाठी वापली जाणारी ही शाई प्रामुख्यानं भारतातच तयार होते. या शाईमध्ये विशिष्ट प्रकारच्या केमिकलचं मिश्रण असतं, ज्यामुळे ही शाई धुतली तरी निवडणुकीनंतर 72 तास तुमच्या हातावर तशीच राहाते. या शाईल इंडेलिबल इंक म्हणून देखील ओळखलं जातं. ही शाई भारतात दोन ठिकाणी तयार होते. एक हैदराबादमधील रायडू लॅबोरेटरीमध्ये आणि दुसरी म्हैसुरमधल्या पेंट्स आणि वार्निश लिमिटेड कंपनीमध्ये. या शाईचं उत्पादन हे प्रामुख्यानं भारतातच होत असल्यानं, जगातील जवळपास 90 टक्के देश या शाईसाठी भारतावर अवलंबून आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.