अनंत आणि राधिकाच्या लग्नात हा चटपटीत मेन्यू, वऱ्हाडी मंडळींना या खास डीशेसची चंगळ
गेले सहा महिन्यांहून अधिक काळ गाजत असलेले देशातील सर्वात चर्चित अनंत आणि राधिका अंबानी यांच्या लग्नाची विवाह घटिका अगदी समीप आली आहे. अखेर उद्या 12 जुलै रोजी हे दोघे बोहल्यावर चढणार आहेत. या विवाहाचा प्री वेडींग सोहळा देखील तितकाच गाजला होता. आता प्रत्यक्ष विवाहाची सुरुवात होत आहे. या लग्न सोहळ्यातील मेन्यू नेमका काय असणार याची उत्सुकता सर्वसामान्यांना लागलीय...
आशियातील सर्वात श्रीमंत असलेल्या अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा ( अनंत ) विवाह बीकेसीच्या जियो कन्व्हेंशन सेंटर येथे 12 जुलै रोजी संपन्न होत आहे. या विवाहाची अख्ख्या जगात चर्चा होत आहे. कारण या विवाहाला पाहुणे म्हणून बॉलीवूड हॉलीवूड पासून ते आंतरराष्ट्रीय किर्तीचे पॉप गायक मोठी बिदागी घेऊन पायधूळ झाडत आहेत. या सोहळ्यात आलू टीक्की पासून ते विविध प्रकारचे पदार्थांची रेलचेल असणार आहे. वऱ्हाडी मंडळींना खूश करण्यासाठी मोठा जामानिमा करण्यात येणार आहेत. या पदार्थाची यादीच बाहर आली आहे.
मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचे लग्न अखेर 12 जुलै रोजी होत आहे .या लग्नात आता अनेक पारंपारिक रितीरीवाज गुजराती समाजानूसार पार पडणार आहेत.या आधी एक पारंपारिक सोहळा नुकताच पार पडला आहे. आता या लग्नात वऱ्हाडी मंडळींना मुंबईच्या प्रसिद्ध वडापावपासून ते थेट उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध चटपटीत पदार्थांचा समावेश असणार आहे. वाराणसीतील काशी भंडार येथील चटपटीत पदार्थ वाढले जाणार आहेत. मुंबईची प्रसिद्ध मिसळ, भेळ आणि वडापाव, पुरणपोळी, मोदक तर असणारच आहेत, शिवाय ढोकळा, फापडा जिलेबी देखील असणार आहे.
वाराणसी दौऱ्यात ठरला मेन्यू
वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन नुकतेच नीता अंबानी यांनी घेतले होते. अंबानी परिवाराला वाराणसीबद्दल विशेष प्रेम आहे. या शहर त्यांच्यासाठी लकी आहे. त्यामुळे येथील ‘काशी चाट भंडार’ या दुकानाला त्यांनी आवर्जून भेट देत येथील पदार्थांचा आस्वाद घेतला होता. आता नीता अंबानी यांच्या शिफासी वरुन येथील खास बनारसी पदार्थांचा अनंत अंबानी याच्या लग्नात खास वेगळा विभाग असणार आहे. त्यामुळे येथे येणार्या वऱ्हाड्यांना हे आगवगळे पदार्थ खायला मिळणार आहेत.
अनंत अंबानीच्या लग्नात मेन्यूत खास काय ?
या काशी भंडारचे मालकाने एएनआयला खास मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी सांगितले की नीता अंबानी यांनी चार-पाच पदार्थांची ऑर्डर दिली आहे. आणि त्यांच्या लग्नात स्टॉल लावण्यासाठी खास आमंत्रण दिले आहे. नीता यांनी आपल्या वाराणसी दौऱ्यावेळी टिक्की चाट, टमाटर चाट, पालक चाट, कुल्फी यांचा आस्वाद घेतला होता. नीता अंबानी येथे आल्यानंतर आपल्या दुकानात प्रचंड गर्दी वाढली असून मोठा फायदा झाल्याचे देखील काशी भंडारच्या मालकाने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.