fire from borewell बोअरवेलमधून अचानक निघू लागली आग, कुणीही जखमी नाही
अशा प्रकारच्या दुर्घटनांना हाताळण्यासाठी ओएनजीसी काम करते. आवश्यक ते नियंत्रण मिळवते. लोकांच्या सुरक्षेची काळजी घेते.
विजयवाडा : बोअरवेलवरील मशीन सुरू केली. अचानक या बोअरवेलमधून पाण्याऐवजी आगीचे लोळ वाहू लागले. या आगीसोबत चिखलही बाहेर पडत होते. पाण्याऐवजी आग बाहेर पडत असल्याचे लक्षात येताच अग्निशमन विभागाला कळवण्यात आले. आंध्र प्रदेशातील राजोले मंडलातील सिवाकोडू गावात ही घटना घडली. अग्निशमन विभागाचे आणि ओएनजीसीचे व्यक्तींनी घटनास्थळी धाव घेतली. जुन्या बोअरवेलला अचानक आग लागली. बोअरवेलमधील मोटार सुरू करताच ही आग लागली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लगेच ओएनजीसीच्या टीमला माहिती देण्यात आली. ओएनजीसीच्या टीमने आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले. या बोअरवेलमधून गेल्या पाच वर्षांपासून पाणी काढण्यात येत होते. परंतु, मशीन सुरू करताच या बोअरवेलला आग लागली.
कोणीही जखमी नाही
अॅसेट मॅनेजर अमित नारायण म्हणाले, अशा प्रकारच्या दुर्घटनांना हाताळण्यासाठी ओएनजीसी काम करते. आवश्यक ते नियंत्रण मिळवते. लोकांच्या सुरक्षेची काळजी घेते. ओएनजीसीने आग नियंत्रण सेवा सुरू केली आहे. प्रादेशिक पातळीवर ओएनजीसीने टीमची नेमणूक केली आहे. बोअरवेलला आग लागलेल्या भागाला निर्बंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. अद्याप कोणीही जखमी झाले नाही. तसेच कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. या भागात ओएनजीसी पाईपलाईन किंवा विहीर नव्हती.
आगीसोबत चिखलही बाहेर पडले
जिल्हा अग्निशमन अधिकारी कोनासीमा पार्थसारधी म्हणाले, शेतकऱ्याने मशीनची बटन सुरू करता बरोबर गॅस गळती सुरू झाली. त्याला आग लागली. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील नरसापूरमधील ओएनजीसीची टीम त्याठिकाणी पोहचली. गॅसचे लिकेजचं ओएनजीसी किंवा गेलच्या पाईपलाईनचा काही संबंध नाही. बोअरवेलमधून चिखलही बाहेर निघाले. ही बोअरवेल १५० फूट खोल आहे. सुमारे एक मेट्रीक टन चिखल बाहेर पडले. गॅसची तीव्रता ही खूप कमी होती. बोअरवेलमधील वरच्या भागातून गॅस लिकेज झाले असावे. दोन दिवसांत हे लिकेज झालेल्या गॅसवर नियंत्रण करता येईल.
एका शेतातील बोअरवेलमधून अचानक आगीचे लोळ निघायला लागले. ही घटना आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यात घडली. ही बोअरवेल राजोलू मंडल तालुक्यातील शिवकोडू गावात आहे. अचानक बोअरवेलच्या छिद्रातून आग निघायला लागली. अग्निशमन दल आणि ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली.