आंध्र प्रदेशमध्ये ‘या’ बड्या नेत्याच्या सभेत राडा; कार्यकर्ते आपापसत भिडले, नंतर चेंगराचेंगरीत 7 जणांचा झाला जागीच मृ्त्यू

टीडीपीचे कार्यकर्ते एकमेकांशी वाद होऊन जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीमुळे चेंगराचेंगरी होऊन 7 जणांचा जागीच मृत्यू झाला.

आंध्र प्रदेशमध्ये 'या' बड्या नेत्याच्या सभेत राडा; कार्यकर्ते आपापसत भिडले, नंतर चेंगराचेंगरीत 7 जणांचा झाला जागीच मृ्त्यू
Follow us
| Updated on: Dec 29, 2022 | 12:08 AM

नवी दिल्लीः आंध्र प्रदेशचे बडे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या सभेदरम्याने जोरदार राडा झाला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडल्याचं सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकूर येथे टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांची जाहीर सभा होती. यावेळी सभेत आलेले कामगार एकमेकांना भिडले.

वाद विकोपाला गेल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मात्र काही वेळातच चंद्राबाबू नायडू यांनी आपले भाषण थांबवले. चंद्राबाबू नायडू 28 ते 30 डिसेंबर या तीन दिवसांच्या काळात नेल्लोर दौऱ्यावर आहेत.

ते बुधवारी कंदुकूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्या जाहीर सभेत टीडीपीचे कार्यकर्ते एकमेकांशी वाद होऊन जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीमुळे चेंगराचेंगरी होऊन 7 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

मेळाव्यादरम्यान जखमी झालेल्या नागरिकांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी चंद्राबाबूंनी मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची आर्थिक मदत आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एनटीआर ट्रस्टमार्फत शिक्षण देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

याप्रकरणी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

या दुर्देवी घटनेनंतर पोलिसांनी असा दावा केला आहे की नेल्लोरमध्ये गर्दी आणि सार्वजनिक सभेदरम्यान कार्यकर्त्यामध्ये हाणामारी झाली. त्यानंतर वादावादी वाढल्याने चेंगराचेंगरी झाल्याने या चेंगराचेंगरीत नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेश भाजप-राज्य सरचिटणीस विष्णू वर्धन रेड्डी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त देताना म्हटले आहे की, आंध्र प्रदेशातील कंदुकुरू येथे टीडीपीच्या जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरीत 7 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मी वायएसआर काँग्रेस पक्षाच्या सरकारला आपत्कालीन-वैद्यकीय मदत देण्याची विनंती करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.