उद्धव ठाकरे यांचा राजीनामा कळीचा मुद्दा ठरूच शकत नाही; सत्तासंघर्षाची सुनावणी संपताच अनिल देसाई यांनी केलेला दावा काय ?

सर्वोच्च न्यायालयात अनेकडा चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे यांचा राजीनामा. हाच मुद्दा कळीचा ठरू शकतो का ? यावर खासदार अनिल देसाई यांनी मोठा दावा केला आहे.

उद्धव ठाकरे यांचा राजीनामा कळीचा मुद्दा ठरूच शकत नाही; सत्तासंघर्षाची सुनावणी संपताच अनिल देसाई यांनी केलेला दावा काय ?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 5:01 PM

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा कळीचा मुद्दा होऊच शकत नाही. सुप्रीम कोर्टाने जेव्हा सांगतिलं कि बहुमत चाचणी झाली असती तर 39 आमदार अपात्र झाले असते. पण, 2019 ला ज्या नियमानुसार गटनेते आणि प्रतोद पदाची निवड झाली त्याच नियमानुसार 27 जूनला ही झाली होती. आणि तोच व्हीप ( Whip ) 3 जुलैलाही होता. त्यामध्ये 39 आमदार हे अपात्र होऊ शकतातच. त्यांनी आत्ताही उल्लंघन केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा राजीनामा कळीचा मुद्दा ठरू शकतो असे नाही असं स्पष्ट खासदार अनिल देसाई यांनी केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत बहुमत चाचणी झाली असतो तर 39 जणांनी मतदान कुठे केले दिसले असते असे कोर्ट म्हणाले त्यावर आमच्या वकिलांनी बाजू मांडली. की तोच व्हीप विधानसभा अध्यक्ष यांच्या निवडीवेळीही तोच व्हीप होता असं अनिल देसाई यांनी म्हंटलं आहे.

उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे न जाता त्यांनी राजीनामा दिला हा कळीचा मुद्दा त्यासाठी होत नाही. 39 आमदारांनी व्हीपचे उल्लंघन केले आहे. 27 जून ला काय आणि 3 जुलै काय एकच व्हीप होता असा मुद्दाही न्यायालयात मांडण्यात आल्याचे अनिल देसाई यांनी म्हंटले आहे.

हे सुद्धा वाचा

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतांना उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचा मुद्दाही युक्तिवादाच्या दरम्यान आला होता. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे जातांना व्हीपचे उल्लंघन केले असते तरचा अपात्रही कारवाई हा मुद्दा चर्चेत आला होता.

याशिवाय ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद संपल्या नंतर भावनिक विधान केले आहे. त्यावरही अनिल देसाई यांनी भाष्य केले आहे. अनिल देसाई यांनी सिब्बल यांनी लढविलेल्या जुन्या केसेसचा संदर्भही यावेळेला दिला आहे.

अनिल देसाई म्हणाले कपिल सिब्बल यांनी अनेक वर्षे सर्वोच्च न्यायालयात काम केले आहे. महत्वाच्या केसेस त्यांनी लढविल्या आहेत. अनेक दशकं त्यांनी काम केले आहे. भारताची घटना जी सर्वोच्च आहे. आणि सर्वोच्च अशा ठिकाणी त्यांनी काम केलं आहे.

संविधानाची मूल्ये कुठेही कमी होता कामा नये, यासाठी त्यांनी विधान केले आहे. भावनिक होऊन ते बोलले आहे की देशाच्या लोकशाहीला अखेरच्या घटका करू नयेत असं कपिल सिब्बल यांनी म्हणणं साहजिकच असल्याचे अनिल देसाई यांनी म्हंटलं आहे.

कपिल सिब्बल हे जेष्ठ वकिल असून त्यांनी अनेक मोठ्या लढाया केल्या आहेत. त्यामुळे लोकशाही तशीच सुरक्षित राहावी असं कपिल सिब्बल यांनी म्हंटलं असल्याचे अनिल देसाई यांनी म्हंटले आहे.

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.