Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समता पक्षाला खतपाणी कोण घालतंय? निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर बोट ठेवत अनिल देसाई यांचा रोख कुणावर ?

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणीचा दुसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवस आहे. यापूर्वीचा युक्तिवाद पाहता ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला असून ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडली आहे.

समता पक्षाला खतपाणी कोण घालतंय? निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर बोट ठेवत अनिल देसाई यांचा रोख कुणावर ?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 10:44 AM

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे. त्यामध्ये ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल ( Adv Kapil Sibbal ) यांनी जवळपास दोन दिवस युक्तिवाद केला आहे. त्यानंतर आज पुन्हा तिसऱ्या दिवशी ही सुनावणी होणार आहे. यामध्ये वकिल अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांचा युक्तिवाद होणार आहे. याच दरम्यान ठाकरे गटाकडे मशाल चिन्ह आहे, त्यावर समता पक्षानेही दावा केला असून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत आणखी एक भर पडणार आहे. त्यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई ( Anil Desai ) यांनी भाजपला नाव न घेता टोला लगावला आहे.

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणीचा दुसऱ्या आठवड्यातील तिसरा दिवस आहे. यापूर्वीचा युक्तिवाद पाहता ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला असून ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडली आहे.

त्याच दरम्यान ही सुनावणी पुढील आठवड्यातही होणार असल्याचा अंदाज ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी लावला आहे. आजचा दिवसही ठाकरे गटाचा युक्तिवाद करण्यासाठीच असल्याचे म्हंटले आहे.

हे सुद्धा वाचा

तर दोन्ही बाजूचा युक्तिवाद पाहता मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यन्त निकाल येणं अपेक्षित असल्याचे खासदार अनिल देसाई यांनी म्हंटले आहे. याशिवाय याच काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे.

याच मशाल चिन्हावर समता पक्षानेही आपला दावा सांगितला आहे. त्या विरोधात समता पक्ष न्यायालयाची पायरी चढणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाची अडचण वाढणार असल्याने अनिल देसाई यांनी भाजपसह एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.

समता पक्षाला कोण बळ देत आहे ? कोणती महशक्ती आहे समता पक्षाला खतपाणी घालत आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला चिन्ह देतांना या सगळ्या बाबी तपासल्या नाहीत का ? यामाघे काही कारण आहे ? असा सवालही अनिल देसाई यांनी उपस्थित केला आहे.

आजच्या दिवशी अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत हे युक्तिवाद करणार आहे. याशिवाय एकनाथ शिंदे यांचेही वकिल युक्तिवाद करणार आहे. त्यामुळे अनेक कळीचे मुद्दे आज चर्चिले जाणार आहे.

पुढील आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी ही सुनावणी होणार असल्याचेही आणि देसाई यांनी म्हंटलं आहे. अखेरच्या टप्प्यात दोन्ही बाजूच्या वकिलांना कोर्ट काही प्रश्न विचारू शकते आणि त्यानंतर निर्णय दिला जाईल असेही खासदार अनिल देसाई यांनी शक्यता वर्तविली आहे.

ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन.
ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, राज-उद्धव युतीवर शिरसाटांची टीका
ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, राज-उद्धव युतीवर शिरसाटांची टीका.
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका.
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं.
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी.
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका.