लाहोर : पाकिस्तानची सीमा ओलांडून भारतात आलेल्या सीमा हैदरचा विषय अजून संपलेला नाही. त्याचवेळी अंजू नावाची भारतीय महिला पाकिस्तानात पोहोचलीय. सीमेपलीकडची ही दोन्ही प्रेम प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनली आहेत. पाकिस्तानात असलेल्या अंजू बद्दल रोज नवनवीन माहिती समोर येतेय. आता अंजूचा पती नसरुल्लाहने एक नवीन दावा केलाय.
नसरुल्लाहने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकार अंजूला सरकारी नोकरी आणि घर देणार आहे. त्याने असा सुद्धा दावा केलाय की, “काही दिवसात अंजू भारतात येईल आणि आपल्या मुलांना घेऊन पुन्हा पाकिस्तानात येईल. अंजू पाकिस्तानात परतली नाही, तर मी सीमा ओलांडून भारतात येईन” असं नसरुल्लाहने म्हटलं आहे.
नसरुल्लाहने काय दावे केलेत?
पाकिस्तानात राहणाऱ्या नसरुल्लाहने इंडिया डेली नावाच्या एका न्यूज चॅनलशी बोलताना ही माहिती दिली. “पाकिस्तान सरकार अंजूला नोकरीसोबत एक घरही देणार आहे. अंजूने इस्लाम धर्म स्वीकारलाय. त्यामुळे तिला पाकिस्तानी नागरिकता सुद्धा मिळेल. ती जे काही करतेय, ते आपल्या मर्जीने करतेय. अंजू ऑगस्ट महिन्यात भारतात परत येईल. ती आपल्या मुलांना घेऊन पुन्हा पाकिस्तानात येईल” असं नसरुल्लाह म्हणाला.
नसरुल्लाहला कसली भिती आहे?
अंजूची भारतात हत्या होऊ शकते, अशी भिती सुद्धा नसरुल्लाहने व्यक्त केली. “मी भारतात गेली, तर माझ्यावर हल्ला होईल, असं अंजूने मला सांगितलय. ऑगस्ट महिन्यात ती भारतात जाईल आणि मुलांना घेऊन पुन्हा पाकिस्तानात येईल” असं नसरुल्लाह म्हणाला.
अंजूच्या मुलांच धर्म परिवर्तन करणार?
“अंजू तिच्या मुलांना घेऊन पाकिस्तानात परतली नाही, तर मी स्वत: भारतात जाईन आणि तिला, मुलांना सोबत घेऊन पाकिस्तानात येईन” असं नसरुल्लाह म्हणाला. अंजूच्या मुलांच धर्म परिवर्तन केलं जाणार नाही, असं तो म्हणाला.
‘अंजूने स्वीकारला इस्लाम धर्म’
अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला त्या बद्दल नसरुल्लाह व्यक्त झाला. “अंजूवर कुठलाही दबाव टाकलेला नाही. ती मागच्या 3 वर्षांपासून आपल्या नवऱ्यापासून वेगळी राहत होती. कोर्टात तिने घटस्फोटासाठी अर्ज सुद्धा केला होता” असं नसरुल्लाह म्हणाला. “मुलांमुळे अंजू पुन्हा भारतात परतणार आहे. व्हिसा संपण्याआधी ती पुन्हा परत येईल” असा नसरुल्लाहचा दावा आहे.