Anju in Pakistan | चुकूनही परत आली तर थेट गोळीच झाडेन ! अंजूला बुरख्यात पाहून भडकले वडील
Anju Nasrullah Love Story : अंजूने पाकिस्तानात इस्लाम कबूल केला आहे. तिचे नसरुल्लाह याच्यासोबतचे फोटोही समोर आले असून त्यामध्ये ती बुरख्यात दिसत आहे. पण त्यामुळे तिचे वडील प्रचंड संतापले आहेत.
Anju in Pakistan | भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूची (Anju in Pakistan) सध्या बरीच चर्चा सुरू आहे. तिने इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि प्रियकर नसरुल्ला याच्याशी निकाहही केला आहे. या सर्व बातम्यांच्या पार्श्वभूमीवर अंजूचे वडील (father) अतिशय संतापले असून त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. अंजूने बुरखा घातल्याचा विषय निघाल्यावर ते भडकले आणि म्हणाले की, ‘ माझी लेक अंजूने मला धोका दिला आहे. माझी इज्जत वेशीवर टांगली. आता ती माझ्यासाठी मेली आहे. माझं गाव आणि माझ्या देशासोबत ती जी वागली, मला त्याची खूप लाज वाटते ‘ अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
‘ माझी मुलगी माझ्यासाठी जिवंतपणीच मेली आहे’ असे अंजूचे वडील गया प्रसाद थॉमस म्हणाले. ‘ मला आता अख्ख्या आयुष्यात कधीच तिचा चेहरा बघायचा नाहीये. ती चुकूनही माझ्याकडे आली तर मी तिला गोळ्या घालीन किंवा स्वत:लाच संपवेन. मला हे सगळं आधीच माहित असतं तर मी कधीच तिला संपवलं असतं, मग ती पाकिस्तानात जाऊच शकली नसती ‘ असे संतप्त गया प्रसाद म्हणाले.
एकीकडे अंजूचे कुटुंबीय तिच्यावर रागावलेले असतानाच तिच्या गावकऱ्यांनीही तिच्यावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. ज्या मुलीने आपल्या गावाबद्दल आणि देशाबद्दल जराही विचार केला नाही, तिला या गावात राहण्याचा काहीच अधिकार नाही. ती चुकूनही या गावात आली तर आम्ही तिला गावातून हाकलून देऊ. तिची आता इथे काहीच गरज नाही, तिने संपूर्ण गावाचं नाव बदनाम केलं आहे अशा शब्दांत गावकऱ्यांनी चीड व्यक्त केली.
भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने तिचा प्रियकर नसरुल्ला याच्याशी निकाह केला. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिचा निकाहनामाही व्हायरल झाला असून त्यात तिचं नाव फातिमा असं लिहिलं आहे. इस्लाम धर्माचा स्वीकार करून तिने निकाह केला आहे. त्यामुळे तिचे कुटुंबीय तिच्यावर प्रचंड नाराज झाले
संपूर्ण कुटुंबानेत इस्लाम स्वीकारावा
ग्वाल्हेर जिल्ह्यातील टेकनपूरमध्ये अंजूचं गाव आहे. अंजूचे वडील गयाप्रसाद थॉमस यांच्या धर्मांतरावरही गावकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मुलीने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर आधी हिंदू, नंतर ख्रिश्चन आणि आता संपूर्ण कुटुंब संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. हे लोक आपला धर्म मानत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. आता जर मुलीने मुस्लिम धर्म स्वीकारला असेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी मुस्लिम होऊन पाकिस्तानात जावे, असेही काहीजण म्हणत आहेत.
अंजूशी बोलण्यासाठी बेचैन होते वडील
अंजू आणि तिचे वडील दोन दिवस व्हॉट्स ॲ पवर बोलत होते. तिचे वडील तिच्या काळजीने खूप अस्वस्थ होते. व्हॉट्सॲप, व्हिडीओ कॉलवर अंजूशी काही बोलणं न झाल्याने त्यांनी तिला व्हॉईस मेसेज पाठव एकदाच, शेवटचं तरी बोलं असेही सांगितले. त्यांच्या मेसेजनंतर अंजून रडणारी इमोजी पाठवली होती. पण आता अंजूचा बुरख्यातील फोटो समोर आल्यावर तिचे वडील खूप चिडले असून ही ( धर्मांतराची) गोष्ट कधीच सहन करू शकत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
अंजूच्या या कृतीमुळे मुलंही तिच्यावर नाराज आहेत. मला आईची काहीच गरज नाही. आम्हाला तिचा चेहराही पाहायचा नाहीये, असं मुलीने सांगितलं असं अंजूचा नवरा अरविंद यांचं म्हणणं आहे.