इंदूरमध्ये येताच बॉम्बने उडवून देऊ; राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी

राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. ही यात्रा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणार आहे. त्यापूर्वीच राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.

इंदूरमध्ये येताच बॉम्बने उडवून देऊ; राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी
इंदूरमध्ये येताच बॉम्बने उडवून देऊ; राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 12:18 PM

इंदूर: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. राहुल गांधी इंदूरमध्ये येताच त्यांना बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे. तसेच भारत जोडो यात्रेतील पोलिसांचा बंदोबस्तही वाढवला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. ही यात्रा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणार आहे. त्यापूर्वीच राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. राहुल गांधी मध्यप्रदेशात येताच त्यांना बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

एका मिठाईच्या दुकानात पत्रं पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पत्राची गंभीर दखल घेतली असून अज्ञात इसमाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे.

येत्या 24 तारखेला राहुल गांधी यांची यात्रा मध्यप्रदेशातील इंदूर येथे जाणार आहे. त्यापूर्वीच हे धमकीचं पत्रं आलं आहे. हे पत्रं कुणी दिलं? पत्रं कधी आणून ठेवलं याबाबतची काहीच माहिती नाहीये. त्यामुळे अज्ञात व्यक्तीला पकडणं पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांची पदयात्रा महाराष्ट्रात आहे. त्यांच्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. हजारो लोक स्वत:हून या रॅलीत सहभागी होत आहेत. राहुल गांधी यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यांच्याकडे तक्रारीही देत आहेत. तसेच त्यांना पाठिंबाही देत आहेत.

या रॅली दरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल विधान केलं आहे. सावरकर हे ब्रिटिशांची पेन्शन घेत होते. त्यांनी माफीनामा दिल्यानेच त्यांना सोडण्यात आलं, असं सांगत राहुल गांधी यांनी कागदपत्रच मीडियासमोर सादर केली. त्यामुळे त्यांच्यावर भाजप आणि मनसेने जोरदार टीका केली आहे.

मनसेने तर राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपनेही ठिकठिकाणी आंदोलन करत राहुल गांधी यांचा निषेध नोंदवला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापलेलं आहे. असं असतानाच राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.