ओडिशातील ‘त्या’ अपघातापेक्षाही मोठी दुर्घटना घडली असती; कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनेकांचे वाचले जीव…

ओडिशा दुर्घटनेनंतर तामिळनाडूतील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. त्यामुळे हे एक मोठे संकट टळले आहे.साहजिकच कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवली नसती तर रेल्वेचा आणखी एक मोठा अपघात घडला असता.

ओडिशातील 'त्या' अपघातापेक्षाही मोठी दुर्घटना घडली असती; कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनेकांचे वाचले जीव...
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 12:25 AM

 चेन्नई :  तामिळनाडूतील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणखी रेल्वेचा मोठा अपघात होता होता टळला. तामिळनाडूमध्ये रेल्वेच्या डब्याच्या चेसिसला तडा गेल्याने रेल्वे अधिकाऱ्यांच्या सावधानगिरीमुळे हा मोठा अपघात टळला. याविषयी अधिकाऱ्यांनी तात्काळ कोल्लम-चेन्नई एक्स्प्रेस रेल्वेला जोडलेला डबा वेगळा करण्यात आला. ओडिशातील मोठ्या रेल्वे अपघातानंतर ही घटना समोर आल्याने अनेकांना याचा धक्का बसला आहे. ओडिशाती अपघातात 275 लोकं ठार झाली असून 1 हजारहून अधिक जण जखमी झाले.

तामिळनाडूमधील सेंगोटाई रेल्वे स्थानकावर रोलिंग स्टॉकच्या तपासणीदरम्यान रविवारी संध्याकाळी रेल्वेच्या बोगीत तडा गेल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.

यावेळी दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काल रविवारी दुपारी 3:36 वाजता, तामिळनाडूतील सेंगोटाई स्थानकात प्रवेश करताना त्या रेल्वेतील एका डब्याला तडा गेल्याचे दिसून आले.

तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर हा डबा त्या ट्रेनमधून वेगळा करून नवीन डबा जोडण्यात आला. तो डबा वेगळा करण्यासाठी किमान एक तास उशीर झाल्याने काही रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता.

याविषयी दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, डब्याला असलेले क्रॅक शोधणाऱ्या कर्मचाऱ्यांचे यानिमित्ताने रेल्वेकडून सत्कार करण्यात येणार आहे.

डब्याजवळ हा तडा गेल्याने त्यामुळे रेल्वेचा मोठा अपघात झाला असता. कामगारांनी सतर्कता दाखवली नसती तर मोठा अनर्थ घडला असता.

ओडिशामध्ये शुक्रवारी संध्याकाळी मोठा रेल्वे अपघात झाला आहे, त्यामध्ये 275 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, आणि 1 हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. या ओडिशातील त्या अपघातानंतर अजूनही तेथील रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे.

ओडिशा दुर्घटनेनंतर तामिळनाडूतील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. त्यामुळे हे एक मोठे संकट टळले आहे.साहजिकच कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवली नसती तर रेल्वेचा आणखी एक मोठा अपघात घडला असता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.