भारतीय नौदलाचा बंगालच्या उपसागरात अचूक मारा, चीन, पाकिस्तानला थेट इशारा

बंगालच्या उपसागरात नुकतंच भारतीय नौदलाच्या शक्तीची प्रचिती देणारं दृष्य पाहायला मिळालं.

भारतीय नौदलाचा बंगालच्या उपसागरात अचूक मारा, चीन, पाकिस्तानला थेट इशारा
Follow us
| Updated on: Oct 31, 2020 | 12:53 AM

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात नुकतंच भारतीय नौदलाच्या शक्तीची प्रचिती देणारं दृष्य पाहायला मिळालं. भारतीय नौदलाच्या अँटीशिप क्षेपणास्त्र या गाईडेड मिसालईची यशस्वी चाचणी करण्यात आलीय. कार्वेट आयएनएस कोरावरुन हे गाईडेड अँटीशिप मिसाईल डागण्यात आलं. शुक्रवारी (30 ऑक्टोबर) भारतीय नौदलानं जारी केलेल्या या व्हिडीओत अवघ्या काही वेळातच या गाईडेड मिसाईलनं त्याचं लक्ष्य भेदल्याचं दिसून आलं (Antiship Missile testing of Indian Navy in Bengal Sea).

या क्षेपणास्त्रानं जास्तीत जास्त अंतरावरुन अचूक लक्ष्यभेद केलाय. एएसएचएमच्या माऱ्यात टार्गेट करण्यात आलेल्या जहाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसतंय. तसेच या शक्तीशाली मिसाईलच्या माऱ्यानं जहाजावर धुराळे लोळ उठले. हा व्हिडीओ जारी करताना भारतीय नौदलाच्या प्रवक्त्यांनी ‘हर काम देश के नाम’ असं कॅप्शन दिलंय. बंगालच्या उपसागरात अँटीशिप मिसाईलची ही यशस्वी चाचणी म्हणजे भारताचा थेटपणे पाकिस्तान आणि चीनला इशारा असल्याचं स्पष्ट होतंय.

विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वीच भारतीय नौदलानं अरबी समुद्रातील सरावातील अँटी-शिप मिसाईल लॉन्चिंगचा एक व्हिडीओ शेअर केला होता. INS प्रबलवरुन जुन्या जहाजाला लक्ष्य करण्यात आलं होतं. ज्यात अँटी-शिप मिसाईलच्या अचूक प्रहारानं ते जहाज समुद्रात बुडालं होतं.

मागील काही दिवसांपासून भारताकडून अनेक मिसाईल्सच्या चाचण्या करण्यात येतायेत. यात जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल ब्रह्मोस आणि अँटी रेडिएशन मिसाईल रुद्रम-1 चाही समावेश आहे. भारतानं अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या हायपरसॉनिक मिसाईल शौर्यचंही परीक्षण केलंय.

यातील रूद्रम-1 भारताचं पहिलं स्वदेशी अँटी रेडिएशन मिसाईल आहे. त्यामुळं भारत शस्त्रसज्जतेतही आत्मनिर्भर होत असल्याचं दिसतंय. त्यात आता पुन्हा एकदा जास्त अंतरावरुन अँटीशिप मिसाईलनंही अचूक लक्ष्यभेद केल्यानं, भारताच्या ताफ्यात शक्तीशाली मिसाईल्सची भर पडत असल्याचं चित्र आहे.

हेही वाचा :

युद्धभूमीवरील भारतीय नौदलाच्या शक्तीचा ‘ट्रेलर’, लक्ष्याचा अचूक वेध घेणारा व्हिडीओ व्हायरल

‘आयएनएस कवरत्ती’ आज नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार, काय आहेत या युद्धनौकेची वैशिष्ट्ये?

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस कवरत्ती’, पाणबुडीविरोधी युद्धनौका निर्मितीमध्ये भारताला मोठं यश

Antiship Missile testing of Indian Navy in Bengal Sea

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.