90 तास कामाचा सल्ला देणाऱ्या सुब्रमण्यमना अनुपम मित्तलचं मजेशीर उत्तर, ‘बायकोकडे नाही पाहिलं तर…’

'शार्क टँक इंडिया'चे जज अनुपम मित्तल यांनी L&T चे चेअरमन एस.एन. सुब्रमण्यन यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. घरी बसून तुम्ही तुमच्या पत्नीला नाही पाहिल तर काय होईल, हे त्यांनी अतिशय मजेशीरपणे मांडलंय.

90 तास कामाचा सल्ला देणाऱ्या सुब्रमण्यमना अनुपम मित्तलचं मजेशीर उत्तर, 'बायकोकडे नाही पाहिलं तर...'
अनुपम मित्तल
Follow us
| Updated on: Jan 13, 2025 | 3:57 PM

कर्मचाऱ्यांनी आठवड्यात किती तास काम करावं याबद्दल आधी नारायण मूर्ती आणि नंतर एस.एन सुब्रमण्यन यांनी केलेल्या विधानांमुळे पेटलेला वाद अद्यापही सुरू आहेच. आठवड्याला किमान 70 तास काम करावं असं इन्फोसिसचे नारायण मूर्ती म्हणाले होते. तर गेल्या आठवड्यात L&T चे चेअरमन एस.एन. सुब्रमण्यन यांनी 90 तास काम करण्याचा सल्ला देत या पेटलेल्या वादात आणखी तेल ओतले. लोकांनी 90 तास काम केलं पाहिजे, कर्मचाऱ्यांनी तर रविवारी देखील सुट्टी घेऊ नये, घरी बसून काय करणार , बायकोकडे किती वेळ पाहणार असंही सुब्रमण्यन म्हणाले होते. त्यांचं हे विधान ऐकताच अनेकांचा भडका उडाला, सोशल मीडियावर तर प्रतिक्रियांचा पूर आला. अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर नाक मुरडली असून विविध मतप्रवाह पहायला मिळत आहेत.

त्यांच्या या विधानावर दिग्गजांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा तसेच सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी यावर विधानं करत वादात उडी घेतली होती. तर आता ‘शार्क टँक इंडिया’चे अनुपम मित्तल यांनी यावर कमेंट करत प्रत्युत्तर दिलंय. अनुपम मित्तल यांनी मजेशीर उत्तर देत लार्सन अँडड टुब्रोचे (L&T) चेअरमन यांच्यावर पलटवार केला आहे. मित्तल यांनी सुब्रमण्यम यांच्या व्हायरल कमेंटवर प्रतिक्रिया दिली आहे. पत्नीकडे एकटक किती वेळ शकता, असे विधान सुब्रमण्यन यांनी केलं होतं, त्यावर मित्तल यांनी X या सोशल मीडिया साईटवर ट्विट करत मजेशीर उत्तर दिलंय. ” पण सर, जर पती-पत्नीने एकमेकांकडे पाहिलं नाही तर आपण जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कसा बनू ? ” अशी (मजेशीर) पोस्ट अनुपम यांनी लिहीली आहे.

त्यांच्या पोस्टवर अनेकांच्या कमेंट्स ल्या आहेत. ‘ तुमच्याकडून अशाच व्यंगात्कम तिरकसपणे उत्तर अपेक्षित होतं’ असं एकाने लिहीलं. ‘ सर तुमचा ह्यूमर, आणि शार्क टँकचा ( शो) टीआरपी दिवसेंदिवस खावात चालला आहे ‘ अशी कमेंट लिहीत एकाने नाराजी दर्शवली. तर आणखी एका यूजरला मित्तल यांनी पोस्ट आवडली, ‘हाहाहाहा, तो चांगला टोला होता,  मला आवडलं’ असं त्याने लिहीलं. अनुपम मित्तल हे विवाहाचे ऑनलाइन पोर्टल Shaadi.com चे संस्थापक आणि CEO आहेत. शार्क टँक इंडियाच्या सीझन एक, दोन आणि तीनमध्येही ते (जज) सहभागी होते.

L&T चेअरमन सुब्रमण्यन काय म्हणाले होते ?

एसएन सुब्रमण्यन यांनी नुकतेच घरी राहण्याच्या गरजेवर प्रश्न उपस्थित केले होते. कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम केले असते तर मला अधिक आनंद झाला असता, असे ते म्हणाले होते. कर्मचाऱ्यांनी आठवड्यात 90 तास काम केलं पाहिजे. सुट्टी घेऊन काय करता ? घरी बसन बायकोकडे किती वेळ बघू शकता ? असे विधान सुब्रमण्यन यांनी केले, ज्यामुळे मोठा वाद पेटला.

दीपीकानेही व्यक्त केली नाराजी

यावर बरीच टीका झाल्यानंतर L&T ने एक निवेदन जारी करून अध्यक्षांच्या कमेंटवर स्पष्टीकरण दिलं. मात्र, दीपिका पदुकोणनेही त्यांच्या वक्तव्याचे खंडन केले आणि त्याचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर शेअर केला. सुब्रमण्यन यांच्या धानावर ती चांगली भडकली होती.

त्यानंतर महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ‘वर्क लाईल बॅलन्स’संदर्भात वक्तव्य केलं होतं. हा वाद चुकीच्या दिशेनं जातोय, मी नारायण मूर्ती आणि दुसऱ्या कॉर्पोरेट लीडर्सचा खूप आदर करतो, पण माझं असं म्हणण आहे की आपण कामाच्या तासांपेक्षा कामाच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. ज्याचा संबंध हा 70 ते 90 तास काम करण्याशी नाहीये. पुढे बोलताना आनंद महिंद्रा यांनी असं देखील म्हटलं होतं, की माझी पत्नी एक सुंदर स्त्री आहे, त्यामुळे तिच्याकडे बघायला मला आवडतं. तर सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनीही आनंद महिंद्रा यांच्या विधानाला दुजोरा दिला होता. ‘रविवारी सुद्धा माझी पत्नी माझ्याकडे बघतच असते’, असं ट्विट पूनावाला यांनी केलं

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.