Apaar ID : फक्त 5 मिनिटात अपार आयडी कसं बनवायचं? जाणून घ्या 6 स्टेप्स
भारतीय शिक्षण पद्धतीतील महत्त्वाचा बदल म्हणजे अपार आयडी. हा 12 अंकी अद्वितीय ओळखपत्र विद्यार्थ्यांसाठी डिजिटल ओळख निर्माण करतो. पालकांच्या परवानगीने, अपार आयडी डिजिलॉकरशी जोडले जाईल, ज्यामुळे शैक्षणिक कागदपत्रे सुरक्षितपणे साठवता येतील.

निर्मिती रसाळ
भारतीय शिक्षण पद्धतीत आता अनेक प्रकारचे बदल होताना दिसत आहेत. आता विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी बनवणं बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची डिजिटल ओळख होणार आहे. APAAR ID चा फुल फॉर्म ‘ऑटोमेटेड परमानेंट अकेडमिक अकाउंट रजिस्ट्र्री’ असा आहे. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात तर विद्यार्थ्यांचं अपार आयडी बनवलं नाही म्हणून शिक्षकांचे पगार कापले जात आहेत. सीबीएसई शाळांनाही विद्यार्थ्यांचे अपार आयडी बनवण्यासाठी नोटिसा पाठवल्या गेल्या आहेत.
अपार आयडी भारत सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनांपैकी एक आहे. हा 12 अंकांचा खास आयडी आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं इंटिग्रेटेड आयडेंटिफिकेशन सिस्टिम तयार होणार आहे. apaar.education.gov.in या अधिकृत वेबसाईटवरही अपार आयडी बनवता येते. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची ही डिजिटल व्यवस्था आहे. कोणतीही शाळा किंवा शिक्षक पालकांच्या परवानगी शिवाय विद्यार्थ्यांचे अपार आयडी बनवू शकत नाही.




APAAR ID Benefits : अपारचा फायदा काय?
अपार आयडी म्हणजे ‘वन नेशन, वन स्टूडेंट’ नवे शैक्षिणक धोरण 2020 (NEP 2020)चा भाग आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांचा अपार आयडी बनवण्यासाठी त्याच्या आईवडिलांची परवानगी आश्यक आहे. त्यामुळे शाळांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांच्या मिटिंगही होत आहेत. अपार आयडी कार्डमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांसह त्याची पर्सनल डिटेल्सही असणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विद्यार्थ्यांचा ब्लड ग्रुप, वजन, उंची आदी डीटेल्स यात असणार आहे. या गोष्टी सार्वजनिक करण्यासाठी पालकांची परवानगी मिळणं आवश्यक आहे.
What is APAAR ID : डिजिलॉकरसोबत इंटिग्रेशन
अपार आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मार्कशीट, पदवी, प्रमाणपत्रे आणि एक्स्ट्रा करिकुलर आदी गोष्टी डिजिटल रुपात सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. अपार आयडीचं इंटिग्रेशन डिजिॉकरसोबत होणार आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यी पदवी, मार्कशीट आदी गोष्टी डीजिलॉकरमध्ये सेव्ह करायचे. आता अपार आयडी आणि डीजिलॉकर एकत्र आल्याने सर्व गोष्टी सोप्या होणार आहेत. त्याला अकादमी बँक ऑफ क्रेडिट्स (Academic Bank of Credits-ABC) शीही जोडलं जाणार आहे.
अपार आयडी कसे बनवावे?
पालकांची परवानगी घ्या : अपार आयडी तयार करण्यासाठी पालकांची परवानगी घेणं आवश्यक आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे.
डिजीलॉकरवर साइन अप करा : डिजीलॉकरची वेबसाइट किंवा अॅप उघडा. अपार आयडीसाठी ‘साइन अप’ करा. मोबाईल नंबर आणि आधार कार्डची माहिती भरा. e-KYC प्रक्रिया पूर्ण करा.
रजिस्ट्रेशन कसं करायचं : डिजीलॉकरमध्ये लॉगिन करा. ‘अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट्स’ सेक्शनमध्ये जा. ‘माझं अकाउंट’ वर क्लिक करा आणि ‘विद्यार्थी’ पर्याय निवडा. शाळा/कॉलेजची माहिती आणि इतर तपशील भरा. आधार कार्ड, फोटो, निवास प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करा.
अपार आयडी कसा डाउनलोड करावा :
अपार आयडीची अधिकृत वेबसाइट apaar.education.gov.in वर जा.
रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. जर तुम्ही आधीच रजिस्टर केले नसेल, तर ‘नवीन रजिस्ट्रेशन’ टॅबवर क्लिक करून तपशील भरा.
लॉगिन केल्यानंतर, Download APAAR ID पर्यायावर क्लिक करा.
तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल. त्याचा वापर करून सत्यापन प्रक्रिया पूर्ण करा.
सत्यापन केल्यानंतर Download PDF टॅबवर क्लिक करा. तुमचा अपार आयडी सेव करा. तुम्हाला हवा असल्यास त्याचा प्रिंटआउटही काढू शकता.
APAAR ID Registration : अपार आयडीसाठी कोण अर्ज करू शकतो?
अपार आयडी तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांची किमान वयोमर्यादा 5 वर्षे असावी लागते. यापेक्षा कमी वय असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी तयार केली जाणार नाही. अपार आयडी तयार करण्यासाठी विद्यार्थ्याला कोणत्यातरी मान्यता प्राप्त शाळा, कॉलेज किंवा विद्यापीठात प्रवेश घेतलेला असावा लागतो. तसेच, अर्जदार भारतीय नागरिक असावा लागतो.