27 मंदिरांना तोडून बनवली कुतुब मिनार जवळ मशीद; आर्कियोलॉजिस्ट के के मोहम्मद यांचा दावा

नवी दिल्ली : देशात सध्या धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या स्थितीत आहे. महाराष्ट्रात सुरू असणारे भोंग्याचे राजकारण देशात धग धरत आहे. तर देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीतील जहांगीरपुरी (Jahangirpuri) मध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी (Hanuman Jayanti) हिंसाचार () झाला. त्यामुळे परिस्थिती अधीक नाजूक बनलेली आहे). त्यातच आता प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ के के मुहम्मद (Archaeologist K. K. Muhammad) यांनी भोपाळमध्ये […]

27 मंदिरांना तोडून बनवली कुतुब मिनार जवळ मशीद; आर्कियोलॉजिस्ट के के मोहम्मद यांचा दावा
पुरातत्वशास्त्रज्ञ, के के मुहम्मद Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 3:29 PM

नवी दिल्ली : देशात सध्या धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या स्थितीत आहे. महाराष्ट्रात सुरू असणारे भोंग्याचे राजकारण देशात धग धरत आहे. तर देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीतील जहांगीरपुरी (Jahangirpuri) मध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी (Hanuman Jayanti) हिंसाचार () झाला. त्यामुळे परिस्थिती अधीक नाजूक बनलेली आहे). त्यातच आता प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ के के मुहम्मद (Archaeologist K. K. Muhammad) यांनी भोपाळमध्ये मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा देशातील सामाजिक, राजकीय वाViolenceतावरण पुन्हा ढवळून निघण्याची चिन्हं दिसत आहे. प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ के के मुहम्मद यांनी कुतुबमिनार (Qutub Minar) भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी 27 मंदिरांना तोडून कुतुबमिनार जवळील कुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधण्यात आल्याचा दावा केला आहे.

कुव्वत-उल-इस्लाम मशीद

सध्या देसातील राजकारण हे धार्मिक ध्रुवीकरणातून जात आहे. त्यातच देशात हनुमान चालिसा आणि मशीदवर असणाऱ्या भोंग्यावरून राजकारण चांगलेच तापलेलं आहे. त्याचदरम्यान आता प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ के के मुहम्मद यांनी भोपाळमध्ये मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, 27 मंदिरे पाडून दिल्लीची कुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधण्यात आली. ही मशीद मंदिरांमधून काढलेल्या दगडांनी बांधली गेली. त्या ठिकाणी अरबी भाषेत लिहिलेल्या शिलालेखांमध्येही याचा उल्लेख आहे. ताजूर मासीर नावाच्या ग्रंथातही त्याचा उल्लेख आहे. ते जागतिक वारसा दिनानिमित्त पुरातत्व विभागाने आयोजित केलेल्या चर्चासत्राच्या कार्यक्रमात बोलत होते.

हा परिसर चौहानांची राजधानी

तसेच ते म्हणाले की, येथे केवळ गणपतीच नाहीत, तर अनेक मूर्ती आहेत. हा परिसर चौहानांची राजधानी होता. त्या परिसरात 27 मंदिरे होती. मशीद बांधण्यासाठी ही मंदिरे पूर्णपणे नष्ट करण्यात आली. त्याच्या जवळ बांधलेल्या कुतुबमिनारची संकल्पना पूर्णपणे इस्लामिक आहे. तसेच कुतुबमिनार हा फ्कत भारतात बांदला गेला असे नाही. याआधी तो समरकंद आणि गुफारा येथे ही बांधण्यात आला होता.

बाबरी मशीद खाली मंदिरांचे अवशेष

विशेष बाब म्हणजे के के मुहम्मद हे आर्कियालॉजी सर्वे ऑफ इंडियाचे माजी रिझनल डायरेक्टर आहेत. त्यांनीच सगळ्यात आधी बाबरी मशीद संदर्भात सांगितले होते. की बाबरी मशीद खाली मंदिरांचे अवशेष आहेत. त्यासंदर्भातील त्यांचे संशोधन पहिल्यांदा 1990 मध्ये प्रकाशित झाले होते. अयोध्या मध्ये राम मंदिराच्या निर्मितीवर जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता. त्यात महत्त्वाची भुमिका ही के के महम्मद यांच्या संशोधनाची होती. तर तज्ज्ञांच्या मते त्यांच्या संशोधनावरच राम मंदिराचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.

इतर बातम्या :

Raj Thackeray: भोंग्याचा मुद्दा यूपीपर्यंत पोहोचला? योगी म्हणतात, ‘धार्मिक परिसराच्या बाहेर आवाज जाता कामा नये’

CM Yogi : उन्माद पसरवणार्‍यांवर कारवाई होणारच; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तंबी

भयंकर! ‘तसल्या’ व्हिडीओत बायको दिसल्याचा संशय, Video पाहून झाल्यावर नवऱ्यानं केली बायकोची हत्या

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.