मणिपूरमध्ये हिंसा, लष्कराच्या जवानांना हिंसा पसरवणाऱ्यांना पाहता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

| Updated on: May 04, 2023 | 7:05 PM

मणिपूरमध्ये शांतता भंग करणाऱ्या लोकांना पाहता क्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश जवानांना देण्यात आले आहेत.

मणिपूरमध्ये हिंसा, लष्कराच्या जवानांना हिंसा पसरवणाऱ्यांना पाहता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
Follow us on

इंफाळ : मणिपूरमध्ये आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पाऊलं उचलताना दिसत आहे. हिंसाचारग्रस्त भागात हिंसा करणाऱ्यांना दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एजन्सीनुसार, राज्यपालांनी हिंसा करणाऱ्या लोकांना पाहताच गोळ्या घालण्याच्या आदेशाला मंजुरी दिली आहे. हिंसाचारग्रस्त भागात लष्कर आणि आसाम रायफल्सचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

जवानांना घेऊन पोहोचलं विमान

मणिपूरमध्ये हिंसा वाढल्यानंतर जवान तैनात करण्यात आले आहेत. यासाठी एअर इडियांचं विमान जवानांना घेऊन इम्फाळमध्ये पोहोचलं.

4,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

सुरक्षा दलांनी आतापर्यंत 4,000 लोकांना हिंसाचारग्रस्त भागातून बाहेर काढले आहे. आठ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती, तर पाच दिवस इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती.

मुख्यमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन

मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी सर्व लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यांनी ट्विट केले की, “राज्यातील सर्वांना माझे नम्र आवाहन आहे की, या घडीला शांतता आणि सलोखा राखण्यासाठी सरकारला सहकार्य करावे.”

मणिपूरच्या लोकसंख्येपैकी सुमारे 53 टक्के लोक मैतेई समुदायातील आहेत. इंफाळमध्ये या लोकांची संख्या खूप जास्त आहे.  40 टक्के लोकं आदिवासी समाजातील आहेत. यामध्ये नागा आणि कुकी समाजातील लोकांचा समावेश आहे. राज्यात ​​हिंसाचारानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आलाय.