फक्त 6 दिवसांत लष्कराने उभारला पूल; लष्कराकडून विक्रमी वेळेत बेली ब्रिजचे बांधकाम पूर्ण

मध्य प्रदेशातील नर्मदापूरम येथील सुखतवा नदीवरील ब्रिटिशकलीन असलेला हा पूल 145 वर्षे जुना आहे. त्यामुळे तो कोसळल्या राज्य प्रशासनाने हा पूल बांधण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले होते. लष्कराकडून हे काम हातात घेण्यात आल्यानंतर तीव्र वेगाने पूल बांधकाम करण्यात आले.

फक्त 6 दिवसांत लष्कराने उभारला पूल; लष्कराकडून विक्रमी वेळेत बेली ब्रिजचे बांधकाम पूर्ण
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 12:23 PM

मुंबईः मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) नर्मदापूरम (Narmdapooram) येथील सुखतवा नदीवरील ब्रिटिशकलीन पूल (Bridge) काही दिवसांपूर्वी कोसळला होता. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना अनेक अडचणी जाणवत होत्या. त्यानंतरराज्य सरकारच्या विनंतीनुसार, या पुलाच्या बांधकामाची जबाबदारी लष्कराकडे सोपविण्यात आली होती. ही जबाबदारी लष्काराकडे देण्यात आल्यानंतर प्रचंड वेगाने काम करत ढासळलेल्या या पुलाचे निर्माणकार्य लष्कराने केवळ सहा दिवसांत पूर्ण करून एक नवीन विक्रम नोंदविला आहे. मुसळधार पावसादरम्यान नागपूर-भोपाळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 46 वर नर्मदापुरमजवळ सुखतवा नदीवरील 90 फूट बेली ब्रिजचे बांधकाम भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या सुदर्शन चक्र कॉर्प्सच्या अभियंत्यांनी 26 ऑगस्ट रोजी सुरू केले होते. हा पूल कोसळल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या ये-जा करण्याच्या समस्या वाढल्या होत्या. त्यामुळे पूल कोसळल्यानंतर तो तत्काळ उभा केला जावा यासाठी नागरिकांसह नेते आणि प्रशासनही आग्रही होते.

त्यामुळे या जुन्या पुलाचे बांधकाम लष्कराकडे देण्यात आल्यानंतर मात्र काही दिवसातच पूर्ण करण्यात आले. लष्कराने पुलाचे काम अतिवेगाने पूर्ण केल्याने नागरिकांधून आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.

ब्रिटिशकालीन पुलाची नवनिर्मिती

मध्य प्रदेशातील नर्मदापूरम येथील सुखतवा नदीवरील ब्रिटिशकलीन असलेला हा पूल 145 वर्षे जुना आहे. त्यामुळे तो कोसळल्या राज्य प्रशासनाने हा पूल बांधण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले होते. लष्कराकडून हे काम हातात घेण्यात आल्यानंतर तीव्र वेगाने पूल बांधकाम करण्यात आले.

वाहतूक व्यवस्था कोलमडली

हा पूल ढासळल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली होती, त्याचा मोठा फटका नागरिकांना बसला होता, आता पूल उभा करण्यात आल्याने येथील वाहतूक व्यवस्थाही सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

लष्काराने जिंकली मनं

ब्रिटिशकलीन असलेला हा पूल 145 वर्षे जुना होता, तो कोसळल्यानंतर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रवास करणे कठीण झाले होते. पूल कोसळल्यामुले या मार्गावरुन होणारी वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. त्यामुळे या पुलाचे काम तत्काळ होणे गरजेचे होते, त्यासाठी लष्काराकडून या पुलाचे काम करण्यात यावे असं मतही व्यक्त करण्यात येत होते. त्यामुळे पुलाचे बांधकाम लष्काराकडे दिल्यानंतर मात्र कित्येक दिवस लागणाऱ्या बांधकामाला सहा दिवसात पूर्ण करण्यात आले.

पूल स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्द

अवघ्या काही दिवसांमध्येच लष्करातील जवानांनी  या पुलाचे बांधकाम पूर्ण केल्याने अभियंत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पूल स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. आमदार प्रेम शंकर वर्मा, एनएचएआयचे प्रकल्प संचालक आर. के. गुप्ता, एनएचएआयचे व्यवस्थापक अखिल सोनी यांची यावेळी उपस्थिती होती.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.