Coromandel Express Accident : कोरोमंडल एक्स्प्रेस अपघातात सुमारे ५० प्रवाशांचा मृत्यू, रेल्वेमंत्र्यांनी आर्थिक मदत केली जाहीर
Coromandel Express accident Odisha : कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात झाला. यात सुमारे ५० जण ठार झाल्याची माहिती आहे. या अपघातात जखमींची संख्या ३०० पर्यंत गेली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मृतकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली.
बालासोर : ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसल्याने मोठा रेल्वे अपघात झाला. या अपघातात सुमारे ५० जणांचा मृत्यू झाला. तर ३०० जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघात झाल्याने उद्याचा मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन लोकार्पण कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव गोवा येथून ओडिशा येथे अपघातस्थळी रवाना झाले आहेत. त्यांनी मृतकांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये देण्याची घोषणा केली. कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसल्याने मोठा रेल्वे अपघात झाला.
बाहानासा स्टेशनजवळ मालवाहू गाडीला शालीमार चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस धडकली. यामुळे कोरोमंडल एक्सप्रेसच्या ८ बोगीज रुळाखाली घसरल्या. बाहानासा बाजार स्टेशनजवळ ही घटना सात वाजून २० मिनिटांनी घडली.
Distressed by the train accident in Odisha. In this hour of grief, my thoughts are with the bereaved families. May the injured recover soon. Spoke to Railway Minister @AshwiniVaishnaw and took stock of the situation. Rescue ops are underway at the site of the mishap and all…
— Narendra Modi (@narendramodi) June 2, 2023
ओडिशाच्या बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेवर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी दुःख व्यक्त केले. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक भूवनेश्वरमध्ये विशेष आयुक्तांकडून नियंत्रण कक्षातून दुर्घटनेच्या स्थितीवर माहिती घेत आहेत. मृतकांचा आकडा वाढत असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली.
रेल्वे अपघात ग्रस्तांना मदतीसाठी भारतीय वायुसेनेची मदत घेतली जात आहे. मृतकांच्या कुटुंबीयांना प्रत्येक दहा लाख रुपयांची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली आहे. तसेच गंभीर जखमींना दोन लाख रुपये तसेच किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केली आहे.
हेल्पलाइन नंबर
रेल्वेने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. यात हावडा स्टेशन 033 26382217, खडगपूर हेल्पलाईन नंबर 8972073925/9332392339, बालासोर हेल्पलाइन नंबर – 8249591559/7978418322 आणि शालीमार हेल्पलाइन नंबर 9903370746 जारी करण्यात आले. चेन्नई सेंट्रलच्या वतीने हेल्पलाइन नंबर्स जारी करण्यात आले. प्रवाशांच्या मदतीसाठी विशेष बूथ सुरू करण्यात आले. या नंबर्सवर संपर्क साधता येईल. – 044- 25330952, 044-25330953 आणि 044-25354771.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हेल्पलाईन नंबर जारी केले. हे नंबर्स असे आहेत. – 033- 22143526/ 22535185.