Arpita Mukherjee : अर्पिता मुखर्जीकडे सापडलेले पैसे मोजायला ईडीला मशीन आणावं लागलं, प्रश्चिम बंगालच्या प्रकरणाने देशात खळबळ

आता ईडीच्या तपासात तेथून पुन्हा नोटांचा ढीग सापडला आहे. ही एकूण किती रक्कम आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र हा पैसा मोजण्यासाठी ईडीने नोट मोजण्याचे यंत्र मागवावे लागले आहे.

Arpita Mukherjee : अर्पिता मुखर्जीकडे सापडलेले पैसे मोजायला ईडीला मशीन आणावं लागलं, प्रश्चिम बंगालच्या प्रकरणाने देशात खळबळ
अर्पिता मुखर्जीकडे सापडलेले 50 कोटी कुणाचे? प्रकरणात नवं ट्विस्ट, माजी मंत्री पार्थ चॅटर्जी म्हणतात...Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 7:41 PM

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) खळबळ माजवून सोडलेल्या शिक्षण घोटाळ्यात (Education Scam) अर्पिता मुखर्जीच्या (Arpita Mukherjee) अडचणीत वाढ होत आहे. बुधवारी दुपारपासून ईडीचे पथक तिच्या दुसऱ्या घरी पोहोचलं असून तपास सुरू आहे. तिच्या या घरी पुन्हा एकदा मोठी रक्कम सापडल्याची माहिती समोर आली आहे. ही रक्कम इतकी जास्त आहे की ईडीने नोट मोजण्याचे मशीनच मागवले आहे. यावेळी ईडीने अर्पिताच्या क्लब टाऊनमधील अपार्टमेंटवर छापा टाकल्याची माहिती मिळाली आहे. तिथेही मोठी रक्कम लपवल्याची माहिती ईडीच्या हाती लागली होती. आता ईडीच्या तपासात तेथून पुन्हा नोटांचा ढीग सापडला आहे. ही एकूण किती रक्कम आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र हा पैसा मोजण्यासाठी ईडीने नोट मोजण्याचे यंत्र मागवावे लागले आहे.

आतापर्यंत काय जप्त केलं?

गेल्या दोन तीन दिवासांपासून ईडीचं धाडसत्र सुरूच आहे. या प्रकरणात आतापर्यंत ईडीने 22 कोटींची रोकड जप्त केली आहे. विदेशी चलनही जप्त करण्यात आले आहे. मागच्या छाप्यात अर्पिताच्या घरातून 20 हून अधिक फोन आणि अनेक कंपन्यांचे कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती.

डायरीत काय सापडलं?

याच शिक्षण घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांनाही ईडीने अटक केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी त्यांची अनेक तास चौकशीही करण्यात आली आहे. ब्लॅक डायरीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अर्पिताच्या घरातून ईडीला मिळालेली हीच डायरी आहे. ही डायरी बंगाल सरकारच्या उच्च आणि शालेय शिक्षण विभागाची असल्याचे सांगण्यात येत आहे. या डायरीत 40 पाने आहेत, ज्यामध्ये बरेच काही लिहिले आहे. ही डायरी एसएससी घोटाळ्याचे अनेक धागेदोरे उघडू शकते.

तपासात काही धागेदोरे हाती लागतील

मात्र आतापर्यंत पार्थ चॅटर्जींकडून तपासात फारसे सहकार्य मिळालेले नाही. ईडीच्या म्हणण्यानुसार त्यांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर इतकेच दिले आहे की त्यांना काहीही माहिती नाही. अशा स्थितीत आगामी काळात पुराव्याच्या आधारे त्यांच्यासमोर आणखी प्रश्न उपस्थित होऊ शकतात. अर्पिता मुखर्जी संबंधी प्रश्नांची संख्याही वाढवू शकते. आतापर्यंत त्यांच्या घरातून रोख रक्कम मिळाली आहे. ती मोजण्याचे काम सध्या सुरू आहे. तर या प्रकरणावरून ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर भाजपने टीकेची झोड उडवली आहे. या टीकेला तोंड देण्याचं आव्हानं त्यांच्यासमोर असणार आहे. तसेच या प्रकरणात आणखीही काही नावं समोर येऊ शकतात.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.