Arpita Mukharjee : अर्पिता मुखर्जीच्या घरात आतापर्यंत सापडलं 30 कोटीचं घबाड! वॉशरुममध्ये मिळाली कॅश, 5 किलो सोनं जप्त

फ्लॅटमधील प्रत्येक अलमारीमध्ये नोटांची बंडलं होती. तर क्लब टाऊन हाऊसच्या फ्लॅटमधून 5 किलो सोनं आणि चांदीचे शिक्के, तसंच सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. 18 तास चाललेल्या या रेडनंतर ईडीचे अधिकारी अर्पिता मुखर्जीच्या फ्लॅटमधून निघाले.

Arpita Mukharjee : अर्पिता मुखर्जीच्या घरात आतापर्यंत सापडलं 30 कोटीचं घबाड! वॉशरुममध्ये मिळाली कॅश, 5 किलो सोनं जप्त
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 12:04 PM

कोलकाता : पश्चिम बंगालच्या (West Bengal) शिक्षक भरती घोटाळ्यात सुरु असलेल्या सुरु असलेल्या तपासात अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीला अर्पिता मुखर्जीच्या अजून एका फ्लॅटमध्ये मोठी रक्कम मिळाली आहे. उत्तर कोलकाताच्या बेलघरिया परिसरातील प्लॅटमध्ये ही रक्कम मिळाली आहे. याची मालक अर्पिता मुखर्जी (Arpita Mukharjee) आहे. या फ्लॅटमध्ये मिळालेली रक्कम मोजण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांना नोटा मोजण्याची मशीन आणावी लागली. चार मशीनद्वारे या नोटांची मोजणी पूर्ण झाली असून, हे तब्बल 30 कोटीचं घबाड आहे. मिळालेल्या माहितीनुसार फ्लॅटमधील प्रत्येक अलमारीमध्ये नोटांची बंडलं होती. तर क्लब टाऊन हाऊसच्या फ्लॅटमधून 5 किलो सोनं आणि चांदीचे शिक्के, तसंच सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. 18 तास चाललेल्या या रेडनंतर ईडीचे अधिकारी अर्पिता मुखर्जीच्या फ्लॅटमधून निघाले. एकूण 10 बॉक्समध्ये ही रक्कम एका ट्रकमधून ईडीचे अधिकारी घेऊन गेले आहेत.

अर्पिताकडे आतापर्यंत तब्बल 50 कोटी रुपयांचं घबाड

यापूर्वी अर्पिता मुखर्जीला तिच्या दक्षिण कोलकातामधील फ्लॅटमध्ये 21 कोटी रुपये रक्कम मिळाल्यानंतर 23 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. म्हणजे अर्पिता मुखर्जीकडे आतापर्यंत तब्बल 50 कोटी रुपयांचं घबाड मिळालं आहे. ईडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्पिताच्या बेलघरियाच्या रथाळा भागातील दोन फ्लॅटचं कुलूप तोडण्यात आलं. कारण त्या फ्लॅटच्या चाव्या मिळाल्या नाहीत. महत्वाची बाब म्हणजे अर्पिता मुखर्जी ही पश्चिम बंगालचे उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय मानली जाते. पार्थ चॅटर्जी यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

पैसे मोजण्यासाठी तीन मशीन

ईडी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आम्हाला सोसायटीच्या दोन फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम मिळाली आहे. पैसे मोजण्यासाठी तीन मशीन मागवल्या होत्या. जेणेकरुन एकूण किती रक्कम आहे हे कळू शकेल. फ्लॅटमध्ये केलेल्या पाहणीत अनेक महत्वाची कागदपत्रही मिळाली आहेत. अर्पिता मुखर्जीने चौकशीदरम्यान कोलकात्याच्या आसपास असलेल्या तिच्या फ्लॅटमधील मालमत्तेबाबत ईडीला माहिती दिली होती. अर्पिता मुखर्जी तपासात सहकार्य करत आहे. पण मंत्री महोदय सहकार्य करत नसल्याची माहितीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.