Monsoon : दोन शाखेतून मान्सूनचे आगमन अन् ‘या’ राज्यातून घेतो वरुणराजा निरोप..!

देशात दोन शाखांमधून मान्सूनचे आगमन होत असले तरी याच पावसावर देशभरातील शेती आणि इतर उद्योग अवलंबून आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशभरात पाऊस सुरू होतो. मान्सून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटांवर धडक देतो आणि 1 जून रोजी केरळमध्ये पोहोचतो. बंगालच्या उपसागरातून मॉन्सूनचे वारे पुढे सरकतात आणि हिमालयावर आदळतात आणि उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात परततात.

Monsoon : दोन शाखेतून मान्सूनचे आगमन अन् 'या' राज्यातून घेतो वरुणराजा निरोप..!
पावसाची खबरबातImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 6:10 AM

मुंबई : शेती क्षेत्राबरोबरच इतर उद्योग, व्यवसायासाठी जसा (Monsoon) मान्सून महत्वाचा आहे त्याचप्रमाणे त्याचा प्रवासही रंजक आहे. आतापर्यंत आपण मान्सूनचे आगमन, सरासरी किती पाऊस पडणार आणि परतीचा पाऊस केव्हा सुरु होणार इथपर्यंतचेच अंदाज घेत आलेलो आहोत. अनिश्चित व अनियमित स्वरुपाच्या असणाऱ्या मान्सूनचे भारत देशात दोन शाखेतून आगमन होते. त्यामुळे सर्वच ठिकाणी समसमान पाऊस पडेल असे नाही. (Two Branches) बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात हे वारे पोहचल्यानंतर याच्या दोन शाखा निर्माण होतात. एक शाखा अरबी समुद्रामध्ये तर दुसरी शाखा बंगालच्या उपसागरात. त्यामुळे देशातील पर्जन्यमानात मोठा फरक असतो. देशांतर्गत भागात (Himalayan range) हिमालय नसते तर उत्तर भारतातील मैदानी भागात मान्सूनचा पाऊस पडला नसता, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दोन शाखांमधून दाखल होणार असा हा मान्सून

देशात अरबी समुद्रातून दाखल होणारा पाऊस हा मुंबई, गुजरात आणि राज्यस्थानातून मार्गे पुढे जातो तर दुसरी शाखा बंगालच्या उपसागरातून पश्चिम बंगाल, बिहार, ईशान्यमार्गे हिमालयाशी धडकते आणि तसेच ते गंगेच्या प्रदेशाकडे वळते. मान्सूनच्या मार्गात पर्वतरांगा आणि हिमालय असल्याने जागोजागी पाऊस बरसत असला तरी त्यामध्ये एकसमानता नसते हेच मान्सूनचे वेगळेपण आहे. अशाप्रकारे वेगवेगळ्या वळणावर प्रवास करीत जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा पाऊस देशभर सक्रीय होतो.

मान्सूनचा देशात असा प्रवास

देशात दोन शाखांमधून मान्सूनचे आगमन होत असले तरी याच पावसावर देशभरातील शेती आणि इतर उद्योग अवलंबून आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशभरात पाऊस सुरू होतो. मान्सून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटांवर धडक देतो आणि 1 जून रोजी केरळमध्ये पोहोचतो. बंगालच्या उपसागरातून मॉन्सूनचे वारे पुढे सरकतात आणि हिमालयावर आदळतात आणि उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात परततात. भारतात मान्सून जूनपासून सप्टेंबरपर्यंत चार महिने सक्रिय असतो. या 4 महिन्यांत किती पाऊस पडेल याचा अंदाज हवामान खाते अनेक बाबींचा वापर करून वर्तवतो.

हे सुद्धा वाचा

राज्यस्थानमध्ये होतो मान्सूनचा शेवट

मान्सूनचे आगमन हे केरळ राज्यातून होत असले तरी शेवट मात्र, वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यस्थानात होतो. देशभर चार महिने पाऊस पडल्यानंतर हंगामाच्या अंतिम टप्प्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस हा राज्यस्थानमध्ये होतो आणि त्यानंतरच भारतातील मानसून हा संपतो. राजस्थान आणि तामिळनाडूच्या काही भागात फक्त 10-15 सेंटीमीटर पाऊस पडतो.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.