तुम्ही Q च्या मांडीवर खेळत होता, जेटलींचा राहुल गांधींवर हल्ला
नवी दिल्ली: राफेल करारावरुन लोकसभेत अभूतपूर्व गोंधळ पाहावयास मिळाला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलवरुन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. त्यानंतर सरकारकडून अर्थमंत्री अरुण जेटलींनी हा हल्ला परतवून, राहुल गांधींसह गांधी परिवारावर प्रतिहल्ला चढवला. लोकसभेत ही सर्व राडेबाजी सुरु असताना, काँग्रेस कार्यकर्त्यांनी कागदी विमानं उडवली, तर भाजप खासदारांनी माँ-बेटा चोर है च्या घोषणा […]
नवी दिल्ली: राफेल करारावरुन लोकसभेत अभूतपूर्व गोंधळ पाहावयास मिळाला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलवरुन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. त्यानंतर सरकारकडून अर्थमंत्री अरुण जेटलींनी हा हल्ला परतवून, राहुल गांधींसह गांधी परिवारावर प्रतिहल्ला चढवला. लोकसभेत ही सर्व राडेबाजी सुरु असताना, काँग्रेस कार्यकर्त्यांनी कागदी विमानं उडवली, तर भाजप खासदारांनी माँ-बेटा चोर है च्या घोषणा दिल्या. या सर्व गदारोळात लोकसभेचं कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आलं.
राहुल गांधींकडून ऑडिओ टेपचा आग्रह
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलवरुन पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांसह केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची राफेलसंदर्भातील कथित ऑडिओ टेप प्ले करण्याची परवानगी राहुल गांधी यांनी मागितल्यानंतर लोकसभा सभागृहात हायव्होल्टेज ड्रामा सुरु झाला. मात्र, कुठलीही खातरजमा नसताना अशाप्रकारची ऑडिओ क्लिप लोकसभेत प्ले करु शकत नाही, असे म्हणत लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितले. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधींच्या आरोपांना उत्तरं दिली. ऑडिओ टेप खोटी आहे, राहुल गांधींना लढाऊ विमानांची साधी माहितीही नाही, असं जेटली म्हणाले.
अरुण जेटलींचा पलटवार
या देशात काही कुटुंब अशी आहेत, ज्यांना पैशाचं गणित समजतं, मात्र देशाच्या सुरक्षेचं गणित समजत नाही, असा हल्लाबोल अरुण जेटली यांनी केला.
“राहुल गांधी सातत्याने खोटं बोलत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून काँग्रेस खोटं पसरवून, देशाच्या सुरक्षेसी खेळत आहे. राहुल गांधी ऑडिओ टेपच्या सत्यतेबाबत का बोलत नाहीत? गोव्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी ही टेप खोटी असल्याचं स्पष्ट केलं आहे. ती ऑडिओ क्लिप खोटी आहे, त्यामुळेच राहुल गांधी त्याची सत्यतेची जबाबदारी घेण्यापासून घाबरत आहेत. फ्रान्सने ओलांद यांचं वक्तव्यही फेटाळलं आहे”, असं अरुण जेटली म्हणाले.
यावेळी जेटली यांनी बोफोर्स, ऑगस्टा वेस्टलँड, नॅशनल हेरॉल्ड या घोटाळ्यांचा उल्लेख केला. या कुटुंबाला (गांधी) देशाच्या सुरक्षेची काळजी नाही. एखादं प्रकरण असतं, तर शंकेला वाव देऊन त्यांच्यावरचे आरोप चुकीचे ठरले असते. पण यांच्याविरोधात इतकी प्रकरणं आहेत, त्यामुळे बोलण्यासारखं काहीही राहिलं नाही, असे टोमणे जेटलींनी लगावले.
ऑडिओ टेप बॉम्ब
राहुल गांधी यांनी आज लोकसभेत निवेदन दिलं. राहुल गांधी म्हणाले, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत पाहिली. त्यात ते म्हणतात माझ्यावर कोणताही आरोप नाही. मात्र ते चुकीचं आहे, राफेल कराराबाबत देशाला उत्तर हवं आहे”
यानंतर राहुल गांधींनी गोव्याचे मंत्री विश्वजीत राणे यांची टेप रेकॉर्डिंग प्ले करण्याची परवानगी मागितली.
मात्र, कुठलीही खातरजमा नसताना अशाप्रकारची ऑडिओ क्लिप लोकसभेत प्ले करु शकत नाही, असे म्हणत लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितले. मात्र, तरीही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा आक्रमक होत, ऑडिओ क्लिप प्ले करत नसाल, तर ट्रान्सस्क्रिप्ट वाचून दाखवण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यालाही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आक्षेप घेतला.
मिस्टर Q चा उल्लेख
यावेळी अरुण जेटली यांनी मिस्टर Q चा उल्लेख केला. Q म्हणजेच बोफोर्स घोटाळ्याचा मुख्य आरोपी क्वात्रोची होय. राहुल गांधी Q च्या मांडीवर खेळत होते, असं म्हणत अरुण जेटलींनी राहुल गांधींवर बोफोर्स, ऑगस्टा आणि नॅशनल हेराल्ड घोटाळ्यावरुन गांधी कुटुंबाला घेरण्याचा प्रयत्न केला.
राफेल विमानांची या देशाला का गरज आहे हे जेटलींनी सांगितलं. कारगील युद्धावेळी आपल्याकडे राफेलसारखी विमानं असती तर 100 किमीवरुनही आपण मिसाईलचा मारा केला असता, असं जेटलींनी सांगितलं. 2001 मध्ये भारतीय सैन्यदलाने ही विमानं खरेदी करण्याची मागणी केली. त्यावेळी 2007 मध्ये 6 कंपन्या आल्या त्यापैकी दसॉल्ट आणि युरोफायटर यांची निवड कऱण्यात आली. त्यावेळी राफेलला मंजुरी देण्यात आली.
वाचा: जेटली म्हणाले ‘Q’, राहुल म्हणाले ‘AA’, लोकसभेत टाळलेली नावं कोणती?
राफेलचा दस्ताऐवज 2012 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळात झाला होता. त्यावेळी संरक्षण मंत्र्यांवर एका बाजूने सैन्यदल आणि दुसऱ्या बाजूने पक्षाचा दबाव होता. संरक्षणमंत्री एक सामान्य माणूस होता. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की राफेल कराराला मंजुरी देतो पण ज्या पद्धतीने हा करार होतोय त्यावर विचार व्हायला हवा. यूपीएने देशाच्या सुरक्षेबाबत खेळ केला, असा हल्लाबोल जेटलींनी केला.
संबंधित बातम्या
जेटली म्हणाले ‘Q’, राहुल म्हणाले ‘AA’, लोकसभेत टाळलेली नावं कोणती?