अर्थसंकल्पापूर्वी धक्का, अर्थमंत्री अरुण जेटलींना कॅन्सरचं निदान

नवी दिल्ली: देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही कॅन्सरचं निदान झालं आहे. अरुण जेटली कालच उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाल्याची बातमी आली. जेटली हे किडनीसंबंधी आजारावरील उपचारासाठी अमेरिकेला गेल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र अरुण जेटली यांना सॉफ्ट टिशू कॅन्सर अर्थात पेशींचा कर्करोग झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशाचा अर्थसंकल्प तोंडावर आला आहे. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. […]

अर्थसंकल्पापूर्वी धक्का, अर्थमंत्री अरुण जेटलींना कॅन्सरचं निदान
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

नवी दिल्ली: देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनाही कॅन्सरचं निदान झालं आहे. अरुण जेटली कालच उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाल्याची बातमी आली. जेटली हे किडनीसंबंधी आजारावरील उपचारासाठी अमेरिकेला गेल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र अरुण जेटली यांना सॉफ्ट टिशू कॅन्सर अर्थात पेशींचा कर्करोग झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

देशाचा अर्थसंकल्प तोंडावर आला आहे. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच अर्थमंत्री अरुण जेटलींना कॅन्सरचं निदान झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता उपचारासाठी जेटली अमेरिकेत असल्यामुळे, ते अर्थसंकल्प मांडण्यास उपलब्ध असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत पियुष गोयल, सुरेश प्रभू किंवा अन्य कोणता मंत्री अर्थसंकल्प मांडू शकतात.

अरुण जेटली यांच्या मांडीत कॅन्सरची गाठ असल्याचं समजतंय.त्यामुळे इतर अवयवांना धोका पोहोचू नये, त्यामुळे तातडीच्या उपचारासाठी जेटली न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. जेटली यांच्यावर याआधीच मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे जेटलींवर पुन्हा शस्त्रक्रीया करण्याबाबत डॉक्टर साशंक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या वर्षी 14 मे 2018 रोजी जेटली यांची किडनी प्रत्यारोपण झाली होती. गेल्या 9 महिन्यांपासून त्यांनी एकही परदेश दौरा केला नव्हता. मात्र आज अरुण जेटलींना कॅन्सर झाल्याचं समोर आलं आहे.

गेल्या वर्षी अरुण जेटली यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांचं डायलसिस करण्यात आलं होतं. जेटलींच्या अनुपस्थितीत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी त्यावेळी अर्थमंत्रालयाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर जेटली पुन्हा 23 ऑगस्ट 2018 पासून अर्थमंत्रालयाचा कार्यभार पाहू लागले.

देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना स्वादूपिंडाचा आजार आहे. त्यांनाही कर्करोग असल्याची माहिती आहे.  त्याआधी कर्नाटकमधील खासदार आणि केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचं कर्करोगाने निधन झालं.  त्यामुळे देशातील बडे नेते कर्करोगाने त्रस्त आहे.

एकीकडे बॉलिवूडमधील दिग्गज मंडळीही कॅन्सरने पीडित आहेत. त्यातच राजकारण्यांचाही नंबर लागत आहे. त्यावरुन देशात कर्करोगाने वेगाने आक्रमण केल्याचं दिसून येतंय.

संबंधित बातम्या 

अरुण जेटली बजेटपूर्वी उपचारासाठी अमेरिकेला रवाना

यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता  

अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोदी सरकार षटकाराच्या तयारीत  

आता पाच लाखांपर्यंत शून्य टॅक्स?  

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.