अरुणाचल प्रदेश : अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh) सीमावर्ती भागात कर्तव्य बजावत असताना 7 जवान हिमस्खलनात (7 soldiers missing) अडकले असून या बेपत्ता सात जवानांचा शोध अजूनही सुरुच आहेत. 15 तासांपेक्षा जास्त काळ उलटून गेला, तरी या जवानांचा थांगपत्ता लागू शकलेला नाही. सध्या या जवानांचा शोध घेण्यासाठी पथकं तैनात करण्यात आली असून युद्धपातळीवर हिमस्खलन (Arunachal Pradesh Avalanche) झालेल्या ठिकाणी बचावकार्य केलं जात आहे. मात्र खराब वातावरणामुळे बचावकार्यातही सातत्यानं अडथळे येत असल्याचं कळतंय. सध्या या जवानांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी विशेष टीमही तैनात करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशातील सीमा भागात कर्तव्य बजावत असताना रविवारी भूस्खलनाची घटना घडल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सोमवारी 7 जवान हे बेपत्ता असल्याचं समोर आलं. आता या जवानांचा शोध घेण्याचं आव्हान पथकांसमोर उभं ठाकलंय.
सात जवान बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सैन्यानं तातडीनं मदतीसाठी पथकं तैनात केली आहे. मात्र ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे अत्यंत कमी तापमान असून सातत्यानं हिमवर्षाव होत असल्याचं बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. अरुणाचल प्रदेशच्या कमेंग सेक्टर इथं ही घटना घडली आहे.
Seven #IndianArmy soldiers missing after avalanche in #ArunachalPradesh pic.twitter.com/Q1ien2FEN0
— Editorji (@editorji) February 8, 2022
भारतीय लष्करातील पूर्व कमांड अरुणाचल प्रदेशातील 1,346 किलोमीटर लांबीच्या एलएसीवर नियंत्रण ठेवते. या ठिकाणी सैन्याची बारीक नजर असते. त्यात सिक्कीमसह अरुणाचल प्रदेश यांचाही समावेश आहे. या कमांडमध्ये तीन कॉर्प्स असून 33 कॉर्म्स सिक्कीममध्ये तैनात असून कामंग सेक्टरमध्ये, चौथी कोर कामेंग सेक्ट तर तिसरी कोर उर्वरीत अरुणाचल प्रदेशात तैनात असतात.
रविवारी हे सातही जवान गस्तीसाठी निघाले होते. त्यावेळी वातावरण बिघडलं आणि हिमस्खलन झालं. याच वेळी जवानही हिम्खलनात अडकले असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. आता 15 तासांहून अधिक काळ उलटला तरीदेखील या जवानांचा शोध लागू न शकल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे. दरम्यान, बेपत्ता झालेले त्या जवानांची नावं नेमकी कळू शकलेली नाही. सध्याच्या घडीला या जवानांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान बचावकार्य करणाऱ्या पथकांसमोर उभं ठाकलंय.
7 #Indian soldiers missing after avalanche hits army patrol
Search, rescue operations are underway in northeastern #ArunachalPradesh state. The incident occurred Sunday in the high-altitude #Kameng sector of Arunachal Pradesh. pic.twitter.com/tIEnf19fTE— Qaisar Waqar (@QaisarWaqar) February 8, 2022
OBC Reservation : सुप्रीम कोर्टात ओबीसी राजकीय आरक्षणाचा निकाल; राज्य सरकार अंतरिम अहवाल सादर करणार
#RIPManiShankarAiyar ट्विटरवर ट्रेन्ड होतोय! गोंधळून जाऊ नका, ते जिवंत आहेत, मग असं का झालंय?