Arvind Kejriwal : ‘आईला पण जुमानत नाही, हा मुलगा इतका मोठा झालाय का?’, अरविंद केजरीवाल यांचा वर्मी घाव, मोहन भागवत यांच्यावर प्रश्नांचा केला भडिमार

Arvind Kejriwal Attack on BJP : लोकसभेतील सत्ता समीकरणानंतर भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळवून घेतल्याची चर्चा जगजाहीर आहे. लोकसभा रणसंग्रामापूर्वी झारखंडमधील एका सभेत भाजप अध्यक्षांनी तर RSS चे महत्व किती आणि काय हे अधोरेखित केले होते. आता नेमका तोच धागा अरविंद केजरीवाल यांनी पकडला आहे.

Arvind Kejriwal : 'आईला पण जुमानत नाही, हा मुलगा इतका मोठा झालाय का?', अरविंद केजरीवाल यांचा वर्मी घाव, मोहन भागवत यांच्यावर प्रश्नांचा केला भडिमार
अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर थेट निशाणा
Follow us
| Updated on: Sep 22, 2024 | 2:45 PM

लोकसभेतील सत्ता समीकरणे बदलली. 400 पारचा नाराच बुमरँग झाला. भाजपला स्वबळावर सत्तेचे मॅजिक फिगर काही गाठता आली नाही. नितीशबाबू आणि चंद्रबाबू हे दोन सत्तादूत धावून आले. भाजपने आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सूर जुळवले आहेत. पण लोकसभा रणसंग्रामापूर्वी झारखंडमधील एका सभेत भाजप अध्यक्षांनी तर RSS चे महत्व किती आणि काय हे अधोरेखित केले होते. आता नेमका तोच धागा अरविंद केजरीवाल यांनी पकडला आहे. त्यांनी आता असा वर्मी घाव घातला आहे.

भाजपवर साधला निशाणा

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संबंधावर तिखट प्रहार केला. RSS ही भाजपची जननी आहे. आई आहे. पण आज भाजप आपल्या आईलाच, मातृसंस्थेलाच डोळे दाखवत आहे. त्यांनाच जुमानत नसल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. जे.पी. नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी एका सभेत भाजपला आरएसएसची गरज नसल्याचे वक्तव्य केले होते. तो धागा पडून केजरीवाल यांनी भाजपचा समाचार घेतला.

हे सुद्धा वाचा

केजरीवाल यांच्या या वक्तव्याने शिळ्या कढीला पुन्हा ऊत आला आहे. आरएसएस आणि भाजप यांच्यात एकोपा असल्याचे जे लोक मानतात, त्यांना केजरीवाल यांचे वक्तव्य झोंबले आहे. जे.पी. नड्डा यांच्या या शेखीवर तुम्हाला दुःख होत नाही का? असा प्रश्न त्यांनी आरएसएस आणि भाजपच्या लोकांना विचारला आहे. अशी शेरेबाजी ही दोन्हींच्या संबधांना ठेच पोहचवणारी असल्याचे केजरीवाल म्हणाले. त्यांनी भाजप हा आरएसएसवर दादागिरी करत असल्याचा टोला लगावला आहे.

मोहन भागवतांवर प्रश्नांचा भडिमार

अरविंद केजरीवाल यांनी आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. पंतप्रधान मोदी हे आमिष देऊन, ईडी आणि तपास यंत्रणांच धाकटशाही वापर करत विरोधी गोटातील नेत्यांना, सरकार यांना पाडत आहेत. लोकशाहीसाठी असे प्रकार योग्य आहेत का? असा खडा सवाल केजरीवाल यांनी भागवतांना केला आहे.

भाजपमध्ये आजच्या घडीला सर्वाधिक भ्रष्टाचारी आहेत. मोदींनी या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. मोदी आणि शाह या जोडगोळीने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच त्यांना त्यांना भाजपच्या गोटात ओढत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप योग्य मार्गावर जात आहे की नाही, हे तपासण्याचे काम संघाचे असल्याची आठवण सुद्धा केजरीवाल यांनी करुन दिली

Non Stop LIVE Update
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.