नेहरूंनी मंदिरं बांधली असती, तर देशाचा विकास झाला असता का? असं केजरीवालांनाची विचारलं होतं, आज त्याच केजरीवालांना लक्ष्मी-गणेश आता पाहिजे…

जवाहरलाल नेहरूंनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जागी मंदिर बांधले असते तर या देशाचा विकास झाला असता का? असा सवाल कधीकाळी केजरीवालांनी केला होता.

नेहरूंनी मंदिरं बांधली असती, तर देशाचा विकास झाला असता का? असं केजरीवालांनाची विचारलं होतं, आज त्याच केजरीवालांना लक्ष्मी-गणेश आता पाहिजे...
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 6:25 PM

नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvin Kejriwal) यांनी केंद्र सरकारकडे आता महात्मा गांधींसोबतचा गणेश-लक्ष्मीचा (Ganesh Laxmi) फोटो भारतीय चलनावर छापण्याची मागणी केली आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारणार असल्याचा युक्तिवाद केजरीवाल यांनी केला आहे. मात्र त्यांच्या या मुद्याकडे गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांच्या हिंदुत्वाचे (Hindutva) राजकारण केले असल्याच्या दृष्टीकोनातून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. या अशा स्थितीत केजरीवाल यांना विकासाच्या राजकारणासोबतच हिंदुत्वाचा राजकीय मार्गाने का जावे लागत आहे असा आता सवाल उपस्थित केला जात आहे.

केजरीवाल यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांना आवाहन केले आहे. भारतीय चलनाच्या एका बाजूला महात्मा गांधींचे चित्र आहे, ते तसेच राहू द्या, पण दुसऱ्या बाजूला गणेश आणि माता लक्ष्मीचाही फोटो लावावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

यामुळे देशाची घसरलेली अर्थव्यवस्था सावरण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नोटांवर लक्ष्मी गणेशाचा फोटो लावल्यास देशाला त्याचा आशीर्वाद मिळणार असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले आहे.

यासाठी ते केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींना पत्रही लिहणार असल्याचे सांगितले जात आहे.

गुजरातमध्ये सध्या निवडणूक प्रचार जोरात सुरू असतानाच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकीच्या तारखाही जाहीर होण्याची शक्यता आहे.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून बाहेर पडलेले केजरीवाल राजकारणातील भ्रष्टाचार संपवून विकासाचे राजकारण करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

अरविंद केजरीवाल त्यावेळी स्वतःची प्रतिमा उजळ आणि विकसित करण्याच्या प्रयत्नात होती. त्यानंतर त्यांचा मुख्य अजेंडा धर्म किंवा मंदिर नसून शाळा आणि विकास हा आहे हेही त्यांना दाखवायचे होते.

2018 मध्ये दिल्लीत एका जाहीर सभेला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले होते की ‘मला प्रश्न पडत होता की, जर जवाहरलाल नेहरूंनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जागी मंदिर बांधले असते तर या देशाचा विकास झाला असता का?’ असा सवाल त्यांनी त्यावेळी उपस्थित केला होता.

तर 2014 मध्ये कानपूरमधील एका सभेत बोलताना त्यांनी सांगितले होते की, माझी आजी म्हणते की, भगवान राम मशीद पाडून मंदिर वसवू शकत नाही. असा उल्लेख त्यांनी त्यावेळी केला होता.

केजरीवालांच्या धर्तीवर 2018 मध्ये आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनीही अयोध्येत राम मंदिराऐवजी विद्यापीठ बनवायला पाहिजे अशी मागणी केली होती.

त्यामुळे त्यावेळी अशा प्रकारे आम आदमी पक्ष धार्मिक राजकारणाऐवजी विकासाचे राजकारण करण्याचा विचार करत होते.

त्यावेळच्या राजकारणाची आणि आताच्या राजकीय परिस्थितीत मात्र जमीन आसमानचा फरक पडला आहे. आम आदमी पक्ष केवळ हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच आता नाही तर राम मंदिर आणि देवांच्या भूमिकांबाबतही त्यांनी आपली भूमिका बदलली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल स्वत:ला हनुमानाचे भक्त म्हणवून घेत होते, तर यूपी निवडणुकीत राम मंदिराच्या दर्शनासाठी आले होते. अशाप्रकारे केजरीवाल यांनी हिंदुत्वाचे कार्ड वापरून आता स्वत:ला खरा हिंदू असल्याचे सिद्ध केले आहे.

नरेंद्र मोदींचा जो काही राजकीय उदय झाला आहे, त्यामागे हिंदुत्वाचा फॉर्म्युला असल्याचे मानले जात आहे. आणि त्याचवेळी हाच प्रयोग भाजपच्या राजकारणातील यशस्वी प्रयोगही म्हटला जात होता.

2002 साली ज्या हिंदुत्व कार्डाच्या माध्यमातून मोदींनी गुजरातमध्ये आपली ओळख निर्माण केली, त्यानंतर ते सत्तेवर आले, आणि त्यांनी एक दशकाहून अधिक काळ सातत्याने सत्ता आपल्या हातात ठेवली आहे. त्यामुळेच त्यांनी हिंदुत्वाचं कार्ड पुढे करुन राजकारण करण्याचा प्रयत्न चालू केल्याचे दिसून येत आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.