Arvind Kejriwal : सर्वात मोठी बातमी; अरविंद केजरीवाल करणार भाजपचा प्रचार, अट काय? काय घडतंय केंद्रीय राजकारणात
Arvind Kejriwal Big Offer to BJP : दिल्लीच्या राजकारणानं अचानक वेगळं वळण घेतलं की काय, अशी विचारणा होत आहे. त्यामागे कारण आहे ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे वक्तव्य. मी तुमचा प्रचार करणार, अशी ऑफर त्यांनी भाजपला दिली आहे. त्यासाठी त्यांनी ही अट घातली आहे.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एका विधानाने राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे वक्तव्य. मी तुमचा प्रचार करणार, अशी ऑफर त्यांनी भाजपला दिली आहे. त्यासाठी त्यांनी ही अट घातली आहे. दिल्लीच्या राजकारणाने नवीन वळण तर घेतले नाही ना , असा काहीसा विचार तुमच्या मनात येत असेल तर थोडं थांबा. काय म्हणाले अरविंद केजरीवाल, कसा काढला त्यांनी भाजपला चिमटा, जाणून घ्या?
डबल इंजिन सरकार सत्तेबाहेर
हरियाणा आणि जम्मु-काश्मीर येथील भाजपची डबल इंजिन सरकार सत्ते बाहेर फेकल्या जाणार असे एक्झिट पोल सांगत असल्याचे ते म्हणाले. एक इंजिन तर जून महिन्यातच खराब झाल्याचा खोचक टोला त्यांनी हाणला. लोकसभा निवडणुकीत 240 जागाच आल्या असा चिमटा त्यांनी काढला. नागरिकांना डबल इंजिनचा चांगलाच अर्थ उमगला, त्याचा अर्थ महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी असा होतो, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
डबल इंजिन फॉर्म्यूला फेल
काही दिवसानंतर दिल्ली विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे भाजपला विचारा की, तुमच्या जागा का कमी झाल्या. उत्तर प्रदेशात यांचे 7 वर्षांपासून डबल इंजिन सरकार आहे. तरीही लोकसभेत त्यांच्या जागा का कमी झाल्या? असा सवाल त्यांनी विचारला. मणिपूरमध्ये 7 वर्षांपासून सत्ता होती. मणिपूर जळत आहे. हे सर्व देशाला मणिपूर करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. आता जर भाजपवाले मतदान मागण्यास आले तर त्यांना नाही सांगा, असे आवाहन त्यांनी केले.
तर मी त्यांचा प्रचार करणार
दिल्लीतील निवडणुकीत आता भाजपवाले येतील. अरविंद केजरीवाल यांनी जे काही काम केलं ते आम्ही पण करणार असे सांगतील. 22 राज्यात भाजपचे सरकार आहे. तिथं दिल्लीसारखी मोफत वीज मिळते का? गुजरातमध्ये गेल्या 30 वर्षांपासून भाजपची सरकार आहे, तिथे एक चांगली सरकारी शाळा दाखवा, असा खोचक टोला त्यांनी लगावला. जर भाजपने या 22 राज्यात मोफत वीज दिली तर दिल्लीतील निवडणुकीत मी भाजपचा प्रचार करेल, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले. त्यांनी भाजपला चांगलाच चिमटा काढला.