अजितदादा स्वाभिमान दाखवा, त्यांनी युतीतून काढायची वाट का पाहताय?; कुणी दिला सल्ला?

Arwind Sawant on Ajit Pawar : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी अजित पवार यांना स्वाभिमान दाखवण्याचा सल्ला दिला आहे. तसंच आज झालेल्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर देखील अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर...

अजितदादा स्वाभिमान दाखवा, त्यांनी युतीतून काढायची वाट का पाहताय?; कुणी दिला सल्ला?
अजित पवार, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 8:06 PM

भाजपच्या नेत्याने अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला. अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, असं विधान भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी केलं आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी अजित पवारांना एक सल्ला दिला आहे. अजित पवार यांनी स्वाभिमान दाखवावा. युतीतून काढायची अजित दादांनी वाट का पाहावी?, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीस भेटीवर प्रतिक्रिया

आजपासून राज्यविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एका भेटीची जोरदार चर्चा होतेय. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधिमंडळ परिसरात भेट झाली. सभागृहात जाताना या दोघांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. याची राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यावर अरविंद सावंत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही माणुसकी सोडलेली नाही. ही शिवसेना आहे… लोकांना समजतं उदार अंतःकरणाचा राजा कोण आहे ते…, असं अरविंद सावंत म्हणालेत.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर अरविंद सावंत म्हणाले…

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर अरविंद सावंत यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी आज जे अभिभाषण केलं. ते क्लेशदायक होतं. त्यांच्या भाषणात राजकीय रंग जास्त होता. त्यांच्या भाषणात 50 वर्ष आधी झालेल्या घटनेचा उल्लेख होता. काल अध्यक्षांनी त्यावर विधान केलं. त्यांच्या शेजारी उपराष्ट्रपती बसले होते. 50 वर्ष आधी जेव्हा घटना घडली. तेव्हा ते उपराष्ट्रपती काँग्रेसमध्ये होते. राष्ट्रपती यांच्याकडून भाषांची ही अपेक्षा नव्हती. त्या महिला असताना त्यांच्या भाषणात मणिपूर घटनेचा त्यांनी उल्लेख देखील केला नाही, हे दुर्दैवी आहे, असं अरविंद सावंत म्हणालेत.

महायुती सरकार पंक्चर झालं आहे. त्याला इंजिन नाही. मालगाडीचे डबे लागले आहेत. शिवसेनासोबत नसताना काय होतं ते बघा…, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याला अरविंद सावंत यांनी उत्तर दिलं आहे.

सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.